जून महिना सुरु व्हायला आलेला असताना उन्हाळ्यातील गरमी थांबायचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस उकाडा आणि उष्णता वाढतच चालला आहे. बुधवारी ३० मे रोजी दिल्ली आणि राजस्थानमधील अनेक भागात 50 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली.
मेजर राधिका सेन यांना युनायटेड नेशन कडून जेंडर एडव्हाकेट ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कांगो देशात त्यांनी बजावलेल्या कामगिरीमुळे त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रचार संपल्यानंतर कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे ध्यानधारणा करण्यासाठी गेले होते. त्यांनी येथे जाऊन ध्यान केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
प्रज्वल रेवन्ना भारतात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. बंगळूर विमानतळावरून SIT ने अटक केली असून त्याला न्य्यायालयापुढे सादर केले जाणार आहे. त्याला १४ दिवसांची कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचार कार्यात सर्वात जास्त धावपळ केली. त्यांनी प्रचाराच्या वेळेला २०० रॅली आणि जाहीर सभा, ८० मीडिया मुलाखती दिल्या. प्रचाराच्या काळात व्यस्त असताना मीडियाला पंतप्रधानांनी मुलाखत देण्यास प्राधान्य दिले.
मुंबईमध्ये मेगाब्लॉक केल्यामुळे ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी रात्रीपासून रविवार दुपारपर्यंत हा मेगाब्लॉक चालणार असल्याचे सांगण्यात आले आहे. फलाट क्रमांकाची रुंद वाढवण्यासाठी हे करण्यात आले आहे.
हसन येथील खासदार प्रज्वल रेवन्ना भारतात दाखल झाला असून त्याला बंगळूर येथील विमानतळावरच अटक करण्यात आली. आज त्याला न्यायालयापुढे हजर केले जाणार असून ते किती दिवसांची शिक्षा ठरवतात त्यानुसार पुढील तपासाला दिशा मिळणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या घडीला वेगवेगळ्या गोष्टी घडत असून त्यामुळे सगळं राजकारण ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केल्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांच्या वकिलाकडून लीगल नोटीस पाठवण्यात आली आहे.
शेअर मार्केटमध्ये ४ जूननंतर चांगले पैसे होतील, असा अंदाज इंटरनॅशनल ब्रोकरेज फर्मने सांगितला आहे. त्यानुसार मोदी शेअर्स या शेअर्सला नाव देण्यात आले असून त्या शेअर्सची संख्या ५४ आहे.
बुधवारी बॉम्बच्या भीतीने बंगळुरूमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर खळबळ उडाली होती. विमानतळावरील अल्फा 3 इमारतीच्या बाथरूमच्या आरशावर लिहिलेल्या धमकीमध्ये 25 मिनिटांत विमानतळ व्यवस्थापन आणि कर्मचारी कार्यालयांवर बॉम्बस्फोट करण्याचा इशारा दिला होता.