संतोष देशमुख हत्येचा धक्कादायक पोस्टमार्टम अहवाल, क्रूर मारहाणीमुळे झाला मृत्यूकेज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोस्टमार्टम अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या शरीरावर 56 जखमा आढळल्या असून, जबर मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे.