उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीतून अचानक निघून गेले आहेत. ते गेल्यानंतर ३८ निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत शेवटच्या क्षणी काही प्रस्ताव आल्यामुळे उपमख्यमंत्री अजित पवार नाराज होते. अर्थ विभागाकडून मंत्रिमंडळातील निर्णयांना विरोध होत होता.
भाजपच्या आमदारांना भूखंड वाटप करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनाई केली होती. यावरून महायुतीमध्ये सगळं व्यवस्थित नसल्याचं दिसून आल आहे.
अजित पवार यांनी अशी कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. नियोजित कार्यक्रम असल्यामुळे मी बाहेर पडल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बेबनाव असल्याचं गेल्या काही दिवसांपासून दिसून आलं आहे. महायुतीच्या जागावाटपात ते दिसून आलं आहे.