ब्रिजभूषण सिंह यांचा मुलगा करण सिंह याच्या मुलाच्या ताफ्यातील गाडीने तिघांना चिरडले असून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तिसऱ्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. घटना घडून गेल्यानंतर करणं सिंह यांनी घटनास्थळी न थांबता तिथून पळून गेले आहेत.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २ जून रोजी तिहार तुरुंगात हजेरी लावावी लागणार आहे. त्यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने स्वीकारली नसून त्यामुळे त्यांची रवानगी ही तुरुंगात होणार आहे. त्यांना १० मे रोजी अंतरिम जामीन जाहीर झाला होता.
भारतात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यापूर्वी भारत आणि फ्रांसमध्ये करारावर चर्चा होणार आहे. त्यावेळी 26 राफेल जेट विमानांबत फ्रांसशी चर्चा केली जाणार असून या पुरवठ्याबाबत विशेष बैठक घेतली जाणार आहे.
सांगली जिल्ह्यात भीषण अपघात घडला असून यामध्ये जागीच सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अल्टो गाडीचा रात्रीच्या वेळी दीड वाजता कॅनलला धडकून भीषण अपघात झाला, अपघात एवढा भीषण होता की गाडीतील सहा जणांचा मृत्यू जागीच झाला आहे.
पुणे येथील कल्याणीनगर अपघातातील नवीन खुलासे समोर येत असून रक्ताच्या सॅम्पलमध्ये पैशांच्या बदल्यात बदल करण्यात आल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात ससून रुग्णालयातील अजय तावरे यांना अटक करण्यात आली आहे.
पुणे अपघातस्थळी रोज नवीन घटना घडल्याचे दिसून येत आहे. घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार येथे अल्पवयीन आरोपीने उपस्थित असणाऱ्या लोकांना तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो, मला सोडून द्या असं म्हटल्याचे सांगितले आहे.
2009 मध्ये स्टार प्लससाठी कंटेंट स्ट्रॅटेजीचे प्रमुख म्हणून नियुक्त झालेले गौरव बॅनर्जी यांनी दिया और बाती हम आणि ससुराल गेंदा फूल सारख्या हिट शोसह चॅनलला हिट बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी भगवान पवार प्रकरणावर चुप्पी साधली असून त्यांनी मीडिया प्रतिनिधीला युद्धात वागणूक दिली आहे. यामुळे तानाजी सावंत आणि भगवान पवार यांच्यात काही गौडबंगाल तर नव्हते ना, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
मंगळवारी पहाटे ५ वाजता इंदिरा गांधी दिल्ली विमानतळावर विमानात बॉम्ब असल्याच्या अफवेमुळे विमान परत उतरवण्यात आले. यावेळी प्रवाशांना विमानातील कर्मचाऱ्यांनी आणि एअर होस्टेसने प्रवाशांना मदत केली.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे त्यांच्या कंपनीचा आयपीओ आणणार असून याबाबतची चर्चा अजून प्राथमिक टप्यावर असल्याची माहिती समजली आहे. या IPO मधील शेअरची किंमत १,२०० रुपये असू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.