Marathi

तुम्हाला डिजिटल अटक झालीय का, भविष्यात कोणती काळजी घ्यावी?

Marathi

नाशिक शहर पोलिसांनी एक्सवरून व्हिडीओ केला पोस्ट

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून नाशिक शहर पोलिसांनी एक्सवरून व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी यामध्ये डिजिटल अटक बाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. 

Image credits: fb
Marathi

डिजिटल अटक हे फसवणुकीचं नवं साधन

डिजिटल अटक हे फसवणुकीचं नवीन साधन बनत चाललं आहे. खोटी माहिती आणि बनावट खटले यामुळे सामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे

Image credits: fb
Marathi

यापासून तुम्ही सुरक्षित कसे राहाल?

कोणताही शासकीय अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीची ओळख नेहमी सत्यापित करा. घाबरू नका, मदत घ्या. जर तुम्हाला एखाद्या तपासणीखाली असल्याचे सांगितले तर त्याबद्दलची खातरजमा करा. 

Image credits: x
Marathi

फसवणूक झाल्यास काय करावे?

जर तुम्ही फसवणुकीला बळी पडला असाल, तर त्वरित १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधा किंवा http://cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.

Image credits: x
Marathi

डिजिटल अटक

डिजिटल अटक कधीच कोणालाच होत नाही. आपल्याला असा कॉल आल्यास त्याबद्दलची माहिती जवळच्या सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये जाऊन द्यावी आणि जागृत राहावं. 

Image Credits: x