दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून दहावीप्रमाणेच बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरला आहे. दहावीमध्ये मुलींचा निकाल 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तब्येतीचे कारण देऊन अतिरिक्त जामीन मागितला आहे. त्यांच्या वकिलांनी टेस्ट बाकी असून यासंदर्भात तपासणीसाठी जामीन आवश्यक असल्याचे न्यायालयात म्हटले आहे.
पुणे हिट अँड रन केसमधील आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयाचे डॉक्टर मागे राहिले नाहीत. अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी डॉ. अजय तावरे यांच्याशी अगरवाल यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधला होता. त्यामुळे तावरे यांना अटक करण्यात आली आहे.
मालगेवमध्ये रात्री राजकीय व्यक्ती असणाऱ्या माजी महापूर अब्दुल मलिक यांच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला आहे. त्यांच्यावर तीन ते चार गोळ्या झाडण्यात आला असून नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये झालेल्या हल्ल्याची नवी दृश्य समोर आली असून यावेळी जीवित आणि वित्त अशा दोन्ही प्रकारच्या हानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे इराणच्या राफाह शहराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अग्निशमन एनओसी नव्हती - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेमिंग झोनकडे चालवण्यासाठी आवश्यक परवाने नव्हते आणि राजकोट महानगरपालिकेकडून फायर क्लिअरन्ससाठी ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) ची नोंद नव्हती.
राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी एक नवीन खुलासा केला आहे. त्यांनी आपल्याला मारहाण झाल्यानंतर संजय सिंह हे भेटायला आले होते अशी माहिती दिली आहे. त्यांनी आपली तब्येतीची विचारपूस घेऊन काळजी घेण्यास सांगितले होते हे म्हटले आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील आंदोलन दडपण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असून यामुळे घटनास्थळावरील शेतकरी संतप्त झाले आहेत. येथे पोलिसांनी काही शेतकऱ्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला आहे.
राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये झालेल्या अपघातात 30 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामधील काही मृतदेहांची ओळख पटलेली नसून त्यांचे डीएनए राजकोट येथील लॅबमध्ये पाठवून त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मुंबई गोवा महामार्गावर हॉलिवूड पद्धतीने ट्रकवर दरोडा टाकण्यात आला. ट्रकच्या मागून येणाऱ्या गाडीतल्या ड्रायव्हरने याचा व्हिडीओ काढला असून तो सोशल मीडियावर सगळीकडे ट्रेंडिंगमध्ये आहे.