एक्झिट पोलनुसार भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष ठरणार असून भाजपा लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकणार आहे. त्यामुळे २०२४ मध्ये एनडीए अआघाडीचे सरकार बनू शकते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये शरमन जोशी एक संदेश देऊन जातो. फेरारी की सवारीमधील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
चीनने अंतराळ क्षेत्रात मोठी झेप घेतली असून त्यांनी चांगई-६ हे चांद्रयान चंद्राच्या दूरच्या बाजूला यशस्वीपणे लँड केले आहे. या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल चीनच्या सर्व संशोधकांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे रविवारी तिहार तुरुंगात परतणार आहेत. त्यांच्या जामिनाला मुदतवाढ देण्यास नकार दिल्यामुळे त्यांना रविवारी तुरुंगात जावे लागणार असून ते पार्टी कार्यकर्त्यांना भेटून जाणार आहेत.
पुणे पोर्शे आघातप्रसंगी अनेक घटना समोर येताना दिसून येत आहेत. अल्पवयीन आरोपीला वाचवायचा नादात संपूर्ण अगरवाल कुटुंब तुरुंगात गेले आहे. या प्रकरणाचा तपास टप्पल १०० पोलिसांची टीम करत आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. सत्तास्थापनेच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा केली जाईल असं सांगण्यात आले आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री वेडींगचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर तो ट्रेंडिंगमध्ये आहे. या कार्यक्रमाला सर्व सेलिब्रेटींनी हजेरी लावलेली दिसून आली आहे.
अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता, यासाठी लागणारी हत्यार पाकिस्तानमधून आणण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेत दोषी असणाऱ्या ६ जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे.
पॅलेस्टाईनचे समर्थन केल्यामुळे नागपुरातील एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी सदर व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या काळातच अप्रिय घटना घडल्याचे दिसून आले आहे. येथे गदारोळ आणि मारामारीच्या घटना घडल्या असून मतदान केंद्रावर गोंधळ झाला आहे. येथे ईव्हीएम मशीन तलावात फेकून देण्यात आले आहे.