10:08 PM (IST) Jul 10

10th July 2025 Updates पळून जायला प्रियसीने दिला नकार, प्रियकराने गळा चिरून केली हत्या

सातारा जिल्ह्यातील शिवथर गावात एका विवाहितेची तिच्या प्रियकराने हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय साबळे याने पूजा जाधव हिचा गळा चिरून खून केला. सहा वर्षांपासून चाललेल्या अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे पोलिसांना संशय आहे.
Read Full Story
07:37 PM (IST) Jul 10

10th July 2025 Updates गुरुग्राममध्ये टेनिस खेळाडू राधिका यादवची हत्या, वडिलांनीच पोरीचा घेतला जीव

गुरुग्राममध्ये टेनिस खेळाडू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी गोळी मारून हत्या केली. सुशांत लोक येथील त्यांच्या निवासस्थानी ही घटना घडली असून वडिलांना ताब्यात घेतले आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Read Full Story
06:49 PM (IST) Jul 10

10th July 2025 Updates ऑनलाईन जुगारात १२०० रुपये हरला, भीतीने १६ वर्षाच्या मुलाने केली आत्महत्या

नाशिकमध्ये एका सोळा वर्षाच्या मुलाने ऑनलाइन गेममध्ये पैसे गमावल्याने आत्महत्या केली. विंजो अॅपवर गेम खेळताना १२०० रुपये गमावल्यानंतर त्याने गळफास घेतला. एकुलत्या एक मुलाच्या मृत्युमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Read Full Story
06:12 PM (IST) Jul 10

10th July 2025 Updates सीपीआर देताना ३ महत्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात, वाचेल एक जीव

सीपीआर टिप्स : व्यक्ती अचानक बेशुद्ध झाल्यास ताबडतोब सीपीआर द्यावे. जर तुम्ही पहिल्यांदाच सीपीआर देणार असाल तर सीपीआर देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घ्या.

Read Full Story
04:50 PM (IST) Jul 10

10th July 2025 Updates राजस्थानमध्ये जग्वार विमान दुर्घटना, २ पायलटचा अपघातात झाला मृत्यू

राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाच्या जग्वार लढाऊ विमानाचा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत दोन पायलट, लोकेंद्र सिंह सिंधू आणि ऋषी राज सिंह देवरा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Read Full Story
02:19 PM (IST) Jul 10

10th July 2025 Updates Amarnath Yatra 2025 - एक लाख भाविकांनी घेतले दर्शन, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही अमरनाथ यात्रेतील भाविकांचा उत्साह कायम आहे. कडक सुरक्षाव्यवस्थेत आतापर्यंत लाखो भाविकांनी बाबा बर्फानींचे दर्शन घेतले आहे.

Read Full Story
01:55 PM (IST) Jul 10

10th July 2025 Updates विलेपार्लेतील जैन मंदिर पाडकाम योग्यच, उच्च न्यायालयाचा ठोस निर्णय, पालिकेच्या कारवाईला दिला पाठिंबा

संपूर्ण मुंबईभर मोठा मोर्चा काढून या कारवाईचा निषेध नोंदवण्यात आला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती. आता मंदिराच्या पाडकामावर उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.

Read Full Story
01:13 PM (IST) Jul 10

10th July 2025 Updates Mohan Bhagwat - "पंचहात्तरीची शाल अंगावर पडली की थांबायचं", मोहन भागवतांनी केलेल्या विधानाची चर्चा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांच्या आयुष्यावर आधारित पुस्ताकाचे प्रकाशन आज झाले. यावेळी मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. 

Read Full Story
12:24 PM (IST) Jul 10

10th July 2025 Updates Mumbai - कर्नाक पुलाचे अखेर नामांतर, 'सिंदूर' ठेवण्यामागील मुख्यमंत्र्यांनी सांगितले खास कारण

मुंबईतील कर्नाक पुलाचे अखेर नामांतर करत सिंदूर असे ठेवण्यात आले आहे. याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यानंतर मीडियासोबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सिंदूर नाव ठेवण्यामागील खास कारण सांगितले आहे. 

Read Full Story
11:33 AM (IST) Jul 10

10th July 2025 Updates Mumbai Weather Update - मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पालघरमध्ये राहणार ढगाळ वातावरण, वाचा हवामान खात्याचा आजचा अंदाज

मुंबई : मुंबई व परिसरात पावसाची उघडीप असली तरी वातावरण दमट आणि ढगाळ राहणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये हवामानात पुन्हा बदल होऊ शकतो. जाणून घेऊया हवामान खात्याचा आजचा अंदाज…

Read Full Story
09:54 AM (IST) Jul 10

10th July 2025 Updates Delhi-NCR Earthquake - दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, नागरिक भीतीपोटी घराबाहेर पडले

दिल्ली-एनसीआरमध्ये भूंकपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. सकाळी 9 वाजून 04 मिनिटांनी नागरिकांना भूकंपाचे धक्के अनुभवले. 4.4 रिश्टर स्केल एवढे धक्के होते.

Read Full Story
09:24 AM (IST) Jul 10

10th July 2025 Updates Guru Purnima 2025 - गुरु पौर्णिमेनिमित्त दुमदुमली साईनगरी, पाहा शिर्डीतील साईबाबा मंदिराचे खास फोटोज

Shirdi Sai Baba Temple Guru Purnima 2025 : गुरू पौर्णिमेच्या पर्वावर, 9 ते 11 जुलै दरम्यान मंदिरात तीन दिवसांच्या सत्संग आणि पूजा विधांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येतात.

Read Full Story
09:16 AM (IST) Jul 10

10th July 2025 Updates Guru Purnima 2025 : गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांना पाठवा शुभेच्छा, त्यांच्या आशिर्वादाने होईल जीवन सुखी

मुंबई : गुरुपौर्णिमा १० जुलैला साजरी केली जाणार आहे. आपल्या आयुष्यातील गुरुंचा सन्मान करून त्यांचे आभार माना. त्यांना खास शुभेच्छापत्रे, मेसेज, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस पाठवून त्यांना वंदन करा. त्यांच्या आशिर्वादाने आपले जीवन सुखी आणि समृद्ध करा.

Read Full Story
09:14 AM (IST) Jul 10

10th July 2025 Updates Guru Purnima 2025 : जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि महत्त्व

गुरु पूर्णिमा दरवर्षी आषाढ शुक्ल पौर्णिमेला साजरी केली जाते. हा दिवस गुरु-शिष्य परंपरेला समर्पित आहे. गुरुंचे आभार मानण्याचा हा दिवस आहे. जाणून घ्या यावेळी गुरु पूर्णिमा कधी आहे? शुभ मुहूर्तसह संपूर्ण माहिती.

Read Full Story
09:12 AM (IST) Jul 10

10th July 2025 Updates Guru Purnima 2025 : आपण गुरुपौर्णिमा का साजरी करतो? काय आहे यामागचे महत्त्व?

गुरु पौर्णिमा २०२५: यंदा गुरु पौर्णिमा १० जुलै, गुरुवारी साजरी केली जाईल. हा सण दरवर्षी आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो, पण हा सण का साजरा करतात हे फार कमी लोकांना माहीत आहे.

Read Full Story
09:11 AM (IST) Jul 10

10th July 2025 Updates Numerology Marathi July 10 आज गुरुवारचे अंकशास्त्र भविष्य : तुमचा दिवस कसा जाईल ते पाहा

मुंबई - प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या. प्रत्येक क्रमांकाला आज अनुरुप दिवस आहे, की काही संकटे येतील ते जाणून घ्या. हे उपाय करुन आयुष्याती संकटे दूर करा. 

Read Full Story
09:10 AM (IST) Jul 10

10th July 2025 Updates Daily Horoscope Marathi July 10 आज गुरुवारचे राशिभविष्य : जाणून घ्या तुमच्या नशिबात आज काय?

मुंबई : आज गुरुपौर्णिमेचा सण आहे. या दिवशी गुरुकडून आशिर्वाद रुपी फळ मिळते. गुरुच्या आशिर्वादाने तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी नांदेल. पुढील स्लाईडवर वाचा तुमचे भविष्य. अखेरच्या स्लाईडवर आजचे पंचांग, शुभ मुहूर्त, राहुकाल और अभिजीत मुहूर्त…

Read Full Story
08:47 AM (IST) Jul 10

10th July 2025 Updates नागपूरमध्ये दोन जण पूरात वाहून गेले

कळमेश्वर येथील बोरगाव उगले परिसरात १८ वर्षीय कार्तिक शिवशंकर लाडसे हा युवक बुधवारी पहाटे गावातील नाला पार करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. शोधमोहीमीनंतर त्याचा मृतदेह सापडला. तसेच सावनेरमधील बोरगाव बुजुर्ग येथे अनिल हनुमंत पानपत्ते (३५) हे नाला पार करताना वाहून गेले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.

Read Full Story