Bihar BJP Minister Nitin Nabin elected as executive president of BJP : बिहारचे नेते आणि आमदार नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची जागा घेतील.

Bihar BJP Minister Nitin Nabin elected as executive president of BJP : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संसदीय मंडळाने रविवारी एक अत्यंत महत्त्वाचा संगठनात्मक निर्णय जाहीर केला आहे. बिहारचे नेते आणि पाटणा येथील आमदार नितीन नबीन यांची पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नड्डांची जागा घेणार

नितीन नबीन हे विद्यमान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची जागा घेतील. केंद्रीय मंत्रिमंडळात जे. पी. नड्डा यांच्यावर मोठी जबाबदारी असल्याने, संघटनेची दैनंदिन कामे पाहण्यासाठी नितीन नवीन यांच्याकडे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नितीन नबीन भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, बिहारमधून ५ वेळा आमदार

नितीन नबीन कोण आहेत: भाजपच्या संसदीय मंडळाने नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. या निर्णयाची माहिती रविवारी, १४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी दिली. नबीन सध्या ४५ वर्षांचे असून २०१० पासून बिहारच्या बांकीपूर मतदारसंघातून आमदार आहेत. जोपर्यंत भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळत नाही, तोपर्यंत नबीन ही जबाबदारी सांभाळतील. नबीन सध्या बिहार सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

२०२० मध्ये अध्यक्ष बनलेले जेपी नड्डा होते मुदतवाढीवर

२०२० मध्ये भाजपने जगत प्रकाश नड्डा यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवले होते. २०२४ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला होता, पण त्यानंतर ते मुदतवाढीवर होते. नड्डा सध्या केंद्रात आरोग्य मंत्रालय सांभाळत आहेत.

पंतप्रधान मोदींनी दिले नितीन नबीन यांना अभिनंदन

पंतप्रधान मोदींनी नितीन नबीन यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी X पोस्टमध्ये लिहिले - श्री नितीन नबीन जी यांनी एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. ते एक तरुण आणि मेहनती नेते आहेत, ज्यांच्याकडे संघटनेचा चांगला अनुभव आहे. बिहारमध्ये आमदार आणि मंत्री म्हणून त्यांचे कार्य खूप प्रभावी राहिले आहे, तसेच लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी पूर्ण समर्पणाने काम केले आहे. ते त्यांच्या विनम्र स्वभावाने जमिनीवर काम करण्यासाठी ओळखले जातात. मला पूर्ण विश्वास आहे की त्यांची ऊर्जा आणि वचनबद्धता येत्या काळात आपल्या पक्षाला अधिक मजबूत करेल. भाजपचे कार्याध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.

श्री नितीन नबीन जी यांनी एक कर्मठ कार्यकर्ता म्हणून आपली विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. वे एक युवा और परिश्रमी नेता हैं, जिनके पास संगठन का अच्छा-खासा अनुभव है। बिहार में विधायक और मंत्री के रूप में उनका कार्य बहुत प्रभावी रहा है, साथ ही जनआकांक्षाओं को पूरा करने के लिए उन्होंने पूरे…

— Narendra Modi (@narendramodi) December 14, 2025

कोण आहेत नितीन नबीन?

नितीन नबीन सिन्हा यांचा जन्म १ सप्टेंबर १९८० रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे झाला. ते भाजपचे ज्येष्ठ नेते नवीन किशोर सिन्हा यांचे पुत्र आहेत. त्यांनी २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत सुमारे ८४,००० मतांनी विजय मिळवला होता. मागील निवडणुकीत त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. नबीन हे भाजपच्या सर्वात तरुण अध्यक्षांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे सरकार आणि संघटना या दोन्ही स्तरांवर काम करण्याचा चांगला अनुभव आहे. ५ वेळा आमदार राहिलेल्या नबीन यांनी बिहार सरकारमध्ये अनेकदा मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांनी भारतीय युवा मोर्चासाठीही मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. नितीन नबीन यांना राज्याचे प्रभारी म्हणून काम करण्याचाही अनुभव आहे.