MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Guru Purnima 2025 : गुरु पौर्णिमेनिमित्त दुमदुमली साईनगरी, पाहा शिर्डीतील साईबाबा मंदिराचे खास फोटोज

Guru Purnima 2025 : गुरु पौर्णिमेनिमित्त दुमदुमली साईनगरी, पाहा शिर्डीतील साईबाबा मंदिराचे खास फोटोज

Shirdi Sai Baba Temple Guru Purnima 2025 : गुरू पौर्णिमेच्या पर्वावर, 9 ते 11 जुलै दरम्यान मंदिरात तीन दिवसांच्या सत्संग आणि पूजा विधांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येतात.

2 Min read
Chanda Mandavkar
Published : Jul 10 2025, 09:24 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
गुरु पौर्णिमा 2025
Image Credit : Facebook

गुरु पौर्णिमा 2025

शिर्डीमधील साई बाबांच्या मंदिरात आज (10 जुलै) असणाऱ्या गुरु पौर्णिमेनिमित्त खास सजावट करण्यात आली आहे. साई बाबांच्या मुर्तीसह मंदिराला फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. 

25
आजचे कार्यक्रम
Image Credit : Facebook

आजचे कार्यक्रम

10 जुलै या मुख्य दिवशी सकाळी काकड आरती, गुरूपूजन, आणि दिवसभर साई सच्चरित्र पठन् या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

Related Articles

Related image1
Guru Purnima 2025 : जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि महत्त्व
Related image2
Guru Purnima 2025 : गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांना पाठवा शुभेच्छा, त्यांच्या आशिर्वादाने होईल जीवन सुखी
35
अखंड पारायणाची समाप्ती
Image Credit : Facebook

अखंड पारायणाची समाप्ती

उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. अखंड पारायण समाप्ती मिरवणूकीत संस्‍थानचे तदर्थ समितीच्‍या अध्‍यक्षा तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश अंजु शेंडे (सोनटक्‍के) यांनी पोथी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा तर उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व मेकॅनिकल विभाग प्रमुख अतुल वाघ यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला यावेळी प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात, प्र.जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

45
फुलांची सजावट
Image Credit : Facebook

फुलांची सजावट

गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त अमेरीका येथील दानशूर साईभक्त श्रीमती सुभा पै यांच्‍या देणगीतुन मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली आहे. याशिवाय श्री साईबाबा मंदिरात गुरु पौर्णिमेच्या महोत्सवात भक्तांसाठी भक्तिमय वातावरण निर्माण करण्यात आले आहे.

55
साईभक्तांची गर्दी
Image Credit : Facebook

साईभक्तांची गर्दी

गुरु पौर्णिमेनिमित्त शिर्डीतील साईनगर भक्तांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. अनेक भाविक सातत्याने साईंच्या दर्शनासाठी अधूनमधून येत असतात. पण आजच्या गुरु पौर्णिमेला खास मानत भाविक मोठी गर्दी करतात. यावेळी मंदिर प्रशासनाकडून VIP दर्शन स्लॉट्सही निश्चित केले आहेत ज्यात दररोज सकाळी, दुपारी व संध्याकाळी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे .

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maharashtra Weather Alert : थंडीचा हाहाकार! महाराष्ट्रात बुधवारी कोल्ड वेव्हचं महासंकट! या 11 जिल्ह्यांना 'अलर्ट'
Recommended image2
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! 'जिवंत सातबारा मोहीम' म्हणजे काय? तुमची अडचण कायमची कशी दूर होईल, पाहा!
Recommended image3
नाताळात कन्फर्म तिकीट हवंय? कोकण रेल्वेची खास भेट!, 'या' विशेष गाड्यांचं संपूर्ण वेळापत्रक पाहा!
Recommended image4
नोकरी गेली... कॅन्सरने जीव नको नकोसा केला! पुणे कर्मचाऱ्याचं 'न्याय मिळेपर्यंत' उपोषण; प्रशासनावर मोठी नामुष्की!
Recommended image5
सुपर-फास्ट गुडन्यूज! मुंबई-नाशिक लोकल मार्गाला ग्रीन सिग्नल! रूट कसा असेल?
Related Stories
Recommended image1
Guru Purnima 2025 : जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि महत्त्व
Recommended image2
Guru Purnima 2025 : गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांना पाठवा शुभेच्छा, त्यांच्या आशिर्वादाने होईल जीवन सुखी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved