मुंबईतील कर्नाक पुलाचे अखेर नामांतर करत सिंदूर असे ठेवण्यात आले आहे. याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यानंतर मीडियासोबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सिंदूर नाव ठेवण्यामागील खास कारण सांगितले आहे. 

मुंबई : मुंबईच्या दक्षिण भागातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या कर्नाक पुलाचे नामकरण आता ‘सिंदूर पूल’ म्हणून करण्यात आले आहे. या पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यानंतर मुख्यमंत्र्यांशी बोलताना पुलाला सिंदूर नाव का दिलेय यामागील कारण सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, मुंबईतील फार जुन्या कर्नाक पुलाची दुरावस्था झाली होती. यामुळे तो पुन्हा बांधण्यात आला. कर्नाक पुलाचे नाव सिंदूर असे अशा कारणास्तव ठेवण्यात आले आहे की, कर्नाक हे ब्रिटीश गव्हर्नर होते. त्यांनी भारतीयांवर खूप अत्याचार केले.खासकरुन, सातारामधील प्रताप सिंह राजे छत्रपती आणि नागपूरमधील मुधोजी राजे यांना वेगवेगळ्या शडयंत्रामध्ये अडकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काहींना जीवेमारण्याचाही प्रयत्न केला. यामुळेच अशा अत्याचारी गव्हर्नरचे नाव बदलून सिंदूर असे नाव दिले जाईल.

ऑपरेशन सिंदूर भारतीयांच्या हृदयात वसलेले ऑपरेशन आहे. कारण पहिल्यांदाच भारताने आपली ताकद दाखवली असून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे आणि एअरबेसेस अतिशय काळजीपूर्वक आणि कोणतेही अधिक नुकसान होणार नाही यापद्धतीने उडवले. अशाच सर्व गोष्टींमुळे पुलाचे नाव बदलून सिंदूर असे ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतला असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

याशिवाय मी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) चे आभार मानू इच्छितो. त्यांनी हा पूल विक्रमी वेळेत पूर्ण केला आहे. मी हा पूल मुंबईच्या नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित करतो. मुंबईकर आज दुपारी ३ वाजल्यापासून या पुलाचा वापर सुरू करू शकतात असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

Scroll to load tweet…

सिंदूर पुलाच्या लोकार्पणानंतर पी. डि' मेलो मार्ग, वालचंद हिराचंद मार्ग, शहीद भगतसिंग मार्ग, युसुफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली रोड, काझी सय्यद रोड आणि सरदार वल्लभभाई पटेल मार्ग या मार्गांवरील वाहतूक सुरळीत होणार आहे. दशकभर पूर्व-पश्चिम वाहतूक अडथळ्यामुळे निर्माण झालेली समस्या या पुलाच्या सुरू झाल्यानंतर सुटणार आहे.

दरम्यान, कर्नाक पूल 150 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता, मात्र तो धोकादायक झाल्याने ऑगस्ट 2022 मध्ये तो पाडण्यात आला. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) या पुलाची पुनर्बांधणी केली. नव्या पुलाची एकूण लांबी 328 मीटर असून त्यात 70 मीटर रेल्वे हद्दीत आहे, तर उर्वरित भाग पोहोच रस्ते आहेत.