राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाच्या जग्वार लढाऊ विमानाचा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत दोन पायलट, लोकेंद्र सिंह सिंधू आणि ऋषी राज सिंह देवरा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
राजस्थानमध्ये २ पायलटचा हवाई अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चुरु येथील हवाई दलाच्या जग्वार लढाऊ विमान अपघातात त्यांना वीरमरण आले आहे. लोकेंद्र सिंह सिंधू आणि ऋषी राज सिंह देवरा असं मृत्युमुखी पडलेल्या २ पायलट्सचे नाव आहेत. सिंधू हरियाणाचे आणि देवरा हे राजस्थान येथील राहणार होते.
दोघांच्या घरच्यांवर दुःखाचे सावट
लोकेंद्र यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. लोकेंद्र यांच्यामागे त्यांची पत्नी, एक महिन्याचा मुलगा आणि पालक आहेत. ऋषिराज सिंह यांना त्यांच्या जन्मगावी म्हणजेच पाली येथे निरोप देण्यात येणार आहे. त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचे सावट कोसळले आहे. ऋषी यांचे अद्याप लग्न झालं नव्हतं त्यांचे कुटुंब त्यांची लग्नाची वाट पाहत होतं आणि ते त्यांच्या मुलासाठी मुलगी शोधत होते.
भारतीय हवाई दलाच्या जग्वार विमानाचं नाव जुलै रोजी राजस्थानातील सुरू येथे निमित्त प्रशिक्षण चालू होतं. त्यावेळी प्रशिक्षण चालू असताना भानुदा गावाजवळ हा अपघात झाला, त्या अपघातामध्ये दोन्ही पायलटचा दुःखद मृत्यू झाला. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं हवाई दलाच्या वतीने सांगण्यात आला आहे.
स्थानिक पोलिसांनी दिली माहिती
यासंदर्भात स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याकडून माहिती मिळाली आहे. त्या माहितीनुसार दुपारी सव्वा एक वाजता भानुदा गावातील एका शेतात अचानक विमान कोसळले. ते विमान कोसळल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना मोठा आवाज ऐकू आला. त्या अपघाताच्या स्थळी आगीच्या ज्वाला उठल्या होत्या आणि सर्वत्र दूर पाहायला मिळाला. त्यानंतर स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
