- Home
- Mumbai
- Mumbai Weather Update : मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पालघरमध्ये राहणार ढगाळ वातावरण, वाचा हवामान खात्याचा आजचा अंदाज
Mumbai Weather Update : मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पालघरमध्ये राहणार ढगाळ वातावरण, वाचा हवामान खात्याचा आजचा अंदाज
मुंबई : मुंबई व परिसरात पावसाची उघडीप असली तरी वातावरण दमट आणि ढगाळ राहणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये हवामानात पुन्हा बदल होऊ शकतो. जाणून घेऊया हवामान खात्याचा आजचा अंदाज…

पावसाची सद्यस्थिती
राज्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली असून 10 जुलै 2025 रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि संपूर्ण कोकण परिसरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काही भागांत मध्यम स्वरूपाच्या सरी आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. किनारपट्टी भागांत दमट हवामान, मध्यम वाऱ्यांचा वेग जाणवण्याची शक्यता आहे.
मुंबईतील हवामान
मुंबईत आज सकाळपासून आकाश ढगाळ राहील. काही भागांत हलक्या सरींचा अनुभव येण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कमी राहणार असल्यामुळे हवामान खात्याने कोणताही अलर्ट दिलेला नाही. मात्र नागरिकांनी छत्री आणि रेनकोट सोबत ठेवणे शहाणपणाचे ठरेल.
उच्चतम तापमान: 31°C
किमान तापमान: 26°C
ठाण्यातील हवामान
ठाण्यात आज काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर नवी मुंबईत सकाळी आणि संध्याकाळी सरी पडण्याची शक्यता आहे. आर्द्रतेमुळे उकाडा आणि घाम जाणवेल. येथे तापमान सुमारे 30–31°C दरम्यान राहणार आहे.
पालघरमधील वातावरण
भारतीय हवामान विभागाने पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे.वसई, डहाणू, तलासरी, बोईसर, विक्रमगड, जव्हार येथे सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढू शकतो.वसई-विरार परिसरात संध्याकाळी जोरदार सरी येण्याची शक्यता.
कोकणातील पावसाचा अंदाज
कोकणात बहुतांश भागांमध्ये सकाळी आणि दुपारी हलक्याच सरी, तर संध्याकाळी काही भागांत मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तरमच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याच्या सुचना दिल्या आहेत.

