सातारा जिल्ह्यातील शिवथर गावात एका विवाहितेची तिच्या प्रियकराने हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय साबळे याने पूजा जाधव हिचा गळा चिरून खून केला. सहा वर्षांपासून चाललेल्या अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे पोलिसांना संशय आहे.
सध्याच्या काळात अनैतिक संबंधांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चाललं आहे. सातारा जिल्ह्यातील शिवथर गावात राहणाऱ्या विवाहितेची हत्या करण्यात आली आहे. विवाहितेच्या घरी गळा चिरून तिच्या प्रियकराने हत्या केली आहे. हे हत्यामागचे ठोस कारण शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. पूजा प्रथमेश जाधव असं हत्या झालेल्या मुलीचे नाव असून अक्षय रामचंद्र साबळे असं अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे.
पोलिसांना काय सांगितलं?
पूजा जाधव असं मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. पती प्रथमेश हा साताऱ्यातील एका दुकानात काम करत असतो. सोमवारी घरी कोणी नसताना पूजेची अक्षयने हत्या केली आहे. पूजा आणि अक्षय या दोघांमध्ये सहा वर्षांपासून अनैतिक संबंध होते. तो त्याच्या प्रियसीकडे लग्न कर म्हणून तगादा लावत होता, त्यामुळं त्यानं दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न केलं नव्हतं.
अक्षयने पूजाचा केला खून
अक्षयने पूजाचा कटरने गळा चिरून खून केला होता. पूजाचा मृत्यू झाल्यानंतर अक्षयने ट्रकमध्ये बसून पुणे गाठले. पोलिसांनी खून झाल्यानंतर पूजाचा मोबाईल चेक केल्यावर त्याच्यामध्ये दोघांची चॅटिंग तपासली. त्यामधून अनेक गोष्टींचा उलगडा होणार असून अक्षयच या गुन्ह्याचा आरोपी आहे असं तपासातून बाहेर येण्याची शक्यता आहे.
पूजा आणि अक्षय या दोघांमध्ये प्रेम फुलत चाललं होत. त्या दोघांमध्ये प्रेम असल्यामुळं यासंदर्भातील धागेदोरे पोलिसांच्या हाती लागणार आहेत. पूजाला जवळच्या लोकांनी अक्षयसोबत संबंध ठेवू नको असं सांगितलं. पूजा तसेच वागत होती अशी माहिती तपासात समोर आली आहे. आता यापुढील माहितीचा तपास पोलिसांच्या वतीने करण्यात येणार आहे.
