11:35 PM (IST) Jul 26

26th July 2025 UpdatesSitare Zameen Par Collection - आमिरच्या "सितारे जमीन पर"ने आतापर्यंत किती कोटी कमावले?

मुंबई - आमिर खान आणि जेनेलिया देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेल्या सितारे जमीन पर या चित्रपटाने कोणताही गाजावाजा न करता बक्कळ कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल २६८ कोटींचा गल्ला कमावला आहे.

Read Full Story
11:29 PM (IST) Jul 26

26th July 2025 Updatesलाडकी बहीण योजनेत १४ हजार पुरुषांसह अनेकांकडून सरकारची फसवणूक?, दोषींवर कारवाई होणार?; सरकार पैसे वसूल करणार का? जाणून घ्या

लाडकी बहीण योजनेचा लाभ १४,२९८ पुरुष आणि अनेक अपात्र महिलांनी घेतल्याची शक्यता आहे. या सरकारी फसवणुकीमुळे तिजोरीला मोठा फटका बसला असून, आता प्रश्न असा आहे की, या लोकांवर काय कारवाई होणार आणि त्यांच्याकडून पैशांची वसुली केली जाईल का?

Read Full Story
11:14 PM (IST) Jul 26

26th July 2025 Updatesइंग्लंडमध्ये बुमराहची ऐतिहासिक कामगिरी, इशांत शर्माच्या रेकॉर्डची केली बरोबरी

जसप्रीत बुमराहने इंग्लंडमधील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या इशांत शर्माच्या विक्रमाची बरोबरी करत नवा इतिहास रचला. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीत त्याने चौथ्या दिवशी ३३ षटकांत २/११२ अशी कामगिरी केली.

Read Full Story
08:00 PM (IST) Jul 26

26th July 2025 Updatesमुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने २० गाड्यांना चिरडले; ४ ठार तर १५ जखमी!

Mumbai Pune Expressway Container Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने २० हून अधिक वाहनांना धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला आणि १५ जण जखमी झाले. हा अपघात खोपोलीजवळ घडला असून, वाहतूक ठप्प झाली आहे.

Read Full Story
07:20 PM (IST) Jul 26

26th July 2025 UpdatesCareer Guide - १२ वी नंतर करिअरचे ६ निवडक पर्याय, कॅम्पस इंटरव्ह्यूतच होईल सिलेक्शन

मुंबई - १२ वी नंतर काय करायचं याबद्दल गोंधळला आहात? टेक, व्यवसाय, आरोग्यसेवा आणि इतर क्षेत्रातील हे ६ भविष्यकालीन पदवी पर्याय एक्सप्लोर करा. मागणी असलेल्या कौशल्यांसह यशस्वी करिअर मिळवा. आत्ताच क्लिक करा!

Read Full Story
07:12 PM (IST) Jul 26

26th July 2025 Updates1 ऑगस्टपासून बदलणार नियम! UPI, गॅस, विमा आणि बँक सुट्ट्यांमध्ये मोठा फेरफार; तुमच्या खिशावर पडणार थेट परिणाम

१ ऑगस्ट २०२५ पासून एलपीजी दर, यूपीआय व्यवहार, क्रेडिट कार्ड विमा सुरक्षा आणि बँकांच्या सुट्ट्यांसंदर्भात नवीन नियम लागू होणार आहेत. या बदलांचा तुमच्या दैनंदिन खर्चावर थेट परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे.
Read Full Story
06:51 PM (IST) Jul 26

26th July 2025 Updatesफडणवीस-शहा 20 मिनिटं बैठक, महायुती मंत्रिमंडळात मोठे बदल? कोणाचे पत्ते कट होणार?

मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहा यांच्यातील गुप्त बैठकीनंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. काही वादग्रस्त मंत्र्यांना हकालपट्टी मिळू शकते, तर नवीन चेहरे मंत्रिमंडळात येऊ शकतात.
Read Full Story
05:27 PM (IST) Jul 26

26th July 2025 UpdatesGanesh Chaturthi 2025 - गणेशोत्सवासाठी ढोल-ताशांचा सराव केल्याने होतात हे ७ आरोग्यदायी फायदे

मुंबई - गणेशोत्सव सुरु होण्याला साधारणपणे एक महिना असला तरी आतापासून ढोल-ताशा वाजवण्याची प्रॅक्टिस सुरु झाली आहे. त्यामुळे सायंकाळ झाली की कानांवर ढोल-ताशांचे आवाज पडत आहेत. ढोल-ताशा वाजवण्याचे काही आरोग्यदारी फायदेही आहेत. जाणून घ्या..

Read Full Story
03:20 PM (IST) Jul 26

26th July 2025 UpdatesRaksha Bandhan Recipes - या रक्षाबंधनाला भावाला द्या तुम्ही तयार केलेला गोड पदार्थ

मुंबई - या राखीला, बहिण भावाच्या प्रेमाची गोडी साजरी करा. घरच्या घरी बनवलेल्या पदार्थांनी रक्षाबंधन साजरे करा. पारंपरिक आवडत्या पदार्थांपासून ते आधुनिक पदार्थांपर्यंत तुम्ही कोणतीही रेसिपी बनवू शकता. तर जाणून घेऊयात या एकापेक्षा एक सरस रेसिपीज..

Read Full Story
02:56 PM (IST) Jul 26

26th July 2025 UpdatesKoneru vs Divya - आज ऐतिहासिक महिला चेस वर्ल्ड कप अंतिम सामना, कोण जिंकणार?

जॉर्जिया - २०२५ च्या महिला चेस वर्ल्ड कपमध्ये कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यात पूर्णपणे भारतीय अंतिम सामना होणार आहे. दोन भारतीय खेळाडू अंतिम फेरीत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे, जी महिला चेसमध्ये भारताचे वर्चस्व दर्शवते.

Read Full Story
02:15 PM (IST) Jul 26

26th July 2025 UpdatesSaiyaara Day 8 Box Office Collection - 'सैयारा'ची ८ व्या दिवशी धमाकेदार कमाई, या चित्रपटांना टाकले मागे

मुंबई - आहान पांडे आणि अनित पड्डाचा 'सैयारा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. मोहित सुरी दिग्दर्शित हा चित्रपट २०२५ मधील एका चित्रपटाचा अपवाद वगळता सर्व चित्रपटांना मागे टाकत आहे. ८व्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती जाणून घ्या.

Read Full Story
01:18 PM (IST) Jul 26

26th July 2025 UpdatesMahavatar Narsimha चित्रपटाला मिळतेच प्रेक्षकांची पसंती, केवढे कोटी कमावले?

मुंबई - दिग्दर्शक अश्विन कुमार यांचा पौराणिक अ‍ॅक्शन ड्रामा ‘महावतार नरसिंह’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त सुरुवात केली आहे. या चित्रपटातील अॅनिमेशन आणि कथानक प्रक्षेकांच्या पसंतीस उतरताना दिसून आहे. जाणून घ्या याबद्दल..

Read Full Story
12:38 PM (IST) Jul 26

26th July 2025 Updatesकोकणातील प्रवाशांना दिलासा! कोरोनात बंद झालेल्या कोलाड आणि अंजनी स्थानकांवर पुन्हा ट्रेन थांबणार

गणेशोत्सवावेळी मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची गर्दी फार वाढली जाते. अशातच कोरोनाच्या काळात बंद करण्यात आलेल्या कोलाड आणि अंजनी रेल्वे स्थानकांचा थांबा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. 

Read Full Story
10:35 AM (IST) Jul 26

26th July 2025 UpdatesGold Rate Today - सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, गुंतवणूकदारांसाठी संधी की सावधगिरी?

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून वाढलेले सोनं आणि चांदीचे दर आता घसरत आहेत. एकीकडे 24 कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली असताना, चांदीचे दर देखील कमी झाले. गुंतवणूकदारांसाठी ही एक संधी असू शकते, पण बाजारातील अस्थिरतेमुळे सावधगिरीही बाळगावी लागेल.

Read Full Story
10:05 AM (IST) Jul 26

26th July 2025 Updates'सैयारा' आणि 'हरि हर वीर मल्लू'ची चर्चा सुरु असताना या तमिळ चित्रपटाने प्रेक्षकांचे वेधले लक्ष, विकेंडला करता येईल प्लान

मुंबई - अहान पांडेचा हिंदी चित्रपट 'सैयारा' आणि पवन कल्याणचा तेलुगू चित्रपट 'हरि हर वीर मल्लू' यांच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, साउथ सुपरस्टार विजय सेतुपतीचा तमिळ चित्रपट 'थलाइवन थलाइवी' ने केवळ बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री घेतली आहे.

Read Full Story
09:56 AM (IST) Jul 26

26th July 2025 Updatesमहाराष्ट्रात गुजराती नव्हे, मराठी पाट्याच चालतील! हायवेवरील रेस्टॉरंट्सना मराठीत मेन्यू कार्ड आणि बोर्ड लावण्याचा मनसेचा इशारा

मनसेकडून मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला मराठीत फलक आणि मेन्यू कार्ड हवेत असा इशारा दिला आहे. याशिवाय गुजराती भाषेतील पाट्या काढून टाकत त्या बदलण्यासही सांगितले. 

Read Full Story
09:05 AM (IST) Jul 26

26th July 2025 UpdatesKargil Vijay Diwas 2025 - कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह लष्करप्रमुखांनी वीर सपूतांना वाहिली श्रद्धांजली

देशात आज 26 वा कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. खरंतर, हा दिवस भारतीय सैन्याचे धाडस, शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक आहे. याच निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या सपूतांना आदरांजली वाहिली आहे.

Read Full Story
08:44 AM (IST) Jul 26

26th July 2025 UpdatesKargil Vijay Diwas 2025 - भारतीय वीरांनी पाकिस्तानच्या तोंडाला आणला होता फेस, पाकिस्तान्यांनी कोल्ह्यासारखी ठोकली होती धूम

मुंबई - १९९९ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेले कारगिल युद्ध हे आधुनिक भारताच्या लष्करी इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण व तेजस्वी पर्व आहे. हे युद्ध जम्मू-काश्मीरमधील कारगिल एलओसी जवळ झाले होते. आज या युद्धाला २६ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Read Full Story
08:37 AM (IST) Jul 26

26th July 2025 UpdatesMumbai Rains - मुंबई पावसाचा कहर! पुढचे २४ तास धोक्याचे, कोकणातही अतिवृष्टीचा इशारा!

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. अशातच पुढील 24 तासही धोक्याचे असून हवामान खात्याने काही ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे. जाणून घ्या आजचे हवामान खात्याचे ताजे अपडेट्स

Read Full Story
08:29 AM (IST) Jul 26

26th July 2025 Updatesआज शनिवारचे राशिभविष्य, या राशिच्या लोकांनी वरिष्ठांशी सावधपणे बोलावे!

श्रावण महिन्याच्या दुसऱ्या दिवशी आणि पहिल्या शनिवारी कसे असेल तुमचे राशिभविष्य ते जाणून घ्या. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे दैनिक भविष्य इथे वाचा. हे भविष्य २६.०७.२०२५ शनिवारचे आहे.

Read Full Story