Financial News: नवीन वर्षाच्या उत्साहात, 1 जानेवारीपासून दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणाऱ्या अनेक नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. बँकिंगमध्ये होणारे  बदल, ITR प्रक्रिया सोपी, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ हे यातील काही मोठे बदल.

(Financial News) नवी दिल्ली: मावळत्या 2025ला निरोप आणि नव्या 2026 वर्षाचे स्वागत करण्यासाठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे. नव्या वर्षात जीवनमानात बदल करण्याच्या दृष्टीने काही संकल्प केले जातील. पण त्याचबरोबर वित्तविषयक काही नियमांमध्येही बदल होणार आहेत. दैनंदिन जीवनावर त्याचा प्रभाव पडणार आहेत. हे बदल बँकिंग व्यवहारापासून यूपीआय आणि इन्कम टॅक्स रिटर्नपर्यंत अनेक बदल होणार आहेत. अर्थातच, हे बदल या सर्व प्रक्रिया आणखी सुलभ होणार आहेत. आपण त्याची माहिती घेऊयात -

1 जानेवारीपासून जीवनमानावर परिणाम करणाऱ्या अनेक नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. नवीन वर्षाच्या उत्साहात याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. यातील काही प्रमुख बदल खालीलप्रमाणे आहेत.

पीएम किसान:

पुढील वर्षापासून पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे विशेष किसान आयडी असणे बंधनकारक असेल. शेतकऱ्यांची जमीन कागदपत्रे, पिकांची माहिती, आधार आणि बँक तपशील या आयडीशी लिंक केले जातील. योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी आणि केवळ पात्र व्यक्तींनाच लाभ मिळावा यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.

8 वा वेतन आयोग:

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची शिफारस करणाऱ्या 8 व्या वेतन आयोगाच्या शिफारसी 1 जानेवारीपासून लागू होणार आहेत. निवृत्तीवेतनधारकांच्या पेन्शनमध्येही वाढ होणार आहे.

UPI:

वाढत्या सायबर फसवणुकीला आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, डिजिटल पेमेंट सिस्टम असलेल्या UPI मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यापुढे मोबाईल सिम व्हेरिफिकेशन अनिवार्य असेल.

सिम व्हेरिफिकेशन:

फक्त UPI साठीच नाही, तर व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसारख्या कम्युनिकेशन ॲप्सच्या वापरासाठीही सिम व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे, यातील गैरप्रकार शोधणे सोपे होईल.

क्रेडिट स्कोअर अपडेट:

यापुढे क्रेडिट ब्युरो साप्ताहिक क्रेडिट स्कोअर अपडेट करतील. पूर्वी हे 15 दिवसांतून एकदा केले जात होते. यामुळे, कर्जाची परतफेड क्रेडिट स्कोअरमध्ये लवकर समाविष्ट होईल आणि कर्ज मिळवण्याच्या पात्रतेवर थेट परिणाम होईल.

इंधनाचे दर:

घरगुती, व्यावसायिक, एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) यासह विविध इंधनांच्या दरांमध्ये मोठा बदल होणार आहे. दरातील नेमका बदल जाहीर झाला नसला तरी, दर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ITR फायलिंग:

2026 पासून ITR फायलिंग प्रक्रिया सोपी होणार आहे. पगार, बँक व्याज, गुंतवणूक, मोठे खर्च यांसारखी माहिती आपोआप आधीच भरलेली असेल. यामुळे प्रक्रिया अधिक वेगवान होईल.

आधार-पॅन लिंक केले नाही? आज शेवटचा दिवस, लिंक करा

नवी दिल्ली: पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे. यानंतर, लिंक न केलेले पॅन कार्ड्स निष्क्रिय होतील.

30 जून 2023 रोजी आधार-पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली होती. त्यानंतर 1000 रुपये दंड भरून लिंक करण्याची संधी आयकर विभागाने दिली होती. पण आता या सर्व पद्धतींसाठी 31 डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे यानंतर लिंक न केलेली पॅन कार्ड्स निष्क्रिय होतील.