१ ऑगस्ट २०२५ पासून एलपीजी दर, यूपीआय व्यवहार, क्रेडिट कार्ड विमा सुरक्षा आणि बँकांच्या सुट्ट्यांसंदर्भात नवीन नियम लागू होणार आहेत. या बदलांचा तुमच्या दैनंदिन खर्चावर थेट परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली : 1 ऑगस्ट 2025 पासून तुमच्या दैनंदिन खर्चावर थेट परिणाम करणारे अनेक नवीन नियम लागू होणार आहेत. या बदलांमध्ये एलपीजी दर, यूपीआय व्यवहार, क्रेडिट कार्ड विमा सुरक्षा, तसेच बँकांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे तुमच्या आर्थिक नियोजनासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होणार?
दर महिन्याच्या 1 तारखेला तेल कंपन्या एलपीजीच्या किंमती नव्याने निश्चित करतात.
जुलैमध्ये 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरमध्ये ₹60 ची घट झाली होती, पण घरगुती गॅसचे दर मात्र स्थिर राहिले.
1 ऑगस्टपासून घरगुती एलपीजी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, जी सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक ठरेल.
त्याचबरोबर सीएनजी आणि पीएनजीचे दर एप्रिल 2025 पासून बदललेले नाहीत. मुंबईत सध्या
सीएनजी – ₹79.50 प्रति किलो
पीएनजी – ₹49 प्रति युनिट
1 ऑगस्टपासून यांच्यातही किंमतीत बदल होऊ शकतो.
UPI पेमेंट व्यवहारांमध्ये नवे नियम लागू
जर तुम्ही Paytm, PhonePe किंवा Google Pay वापरत असाल, तर ही माहिती अत्यावश्यक आहे.
दिवसातून फक्त 50 वेळा बॅलन्स तपासता येणार
मोबाईलशी लिंक असलेली बँक खाती 25 वेळा पाहता येणार
ऑटोपे ट्रांजेक्शन दिवसातून 3 वेळाच (सकाळी 10पूर्वी, दुपारी 1-5 दरम्यान, रात्री 9:30 नंतर)
फेल ट्रांजेक्शनचे स्टेटस दिवसातून फक्त 3 वेळा तपासता येणार
प्रत्येक चेकमध्ये किमान 90 सेकंदांचे अंतर आवश्यक
हे नियम भारतीय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन (NPCI) कडून लागू केले जाणार आहेत.
ऑगस्टमध्ये बँका 11 दिवस बंद
ऑगस्टमध्ये सुट्ट्यांचा पाऊस
रविवार, दुसरा व चौथा शनिवार
स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट)
गणेशोत्सव आणि इतर सण
या सर्व सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रात एकूण 11 दिवस बँका बंद राहतील. त्यामुळे आधीच व्यवहाराचे नियोजन करा.
क्रेडिट कार्ड विमा संरक्षण होणार बंद
क्रेडिट कार्ड धारकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट!
11 ऑगस्टपासून SBI को-ब्रँडेड कार्ड्सवरील हवाई अपघात विमा सुरक्षा बंद होणार आहे.
यामध्ये SBI, UCO Bank, Central Bank, PSB, Karur Vysya Bank, Allahabad Bank यांच्या कार्डांचा समावेश
सध्या मिळणारे विमा संरक्षण ₹50 लाख ते ₹1 कोटी दरम्यान आहे
पण आता ही सुविधा थांबणार असल्याने नवीन पर्यायांचा विचार करणे आवश्यक


