अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा फायटर सिनेमा गेल्या दोन आठवड्यांपूर्वी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. पण आता 'फायटर' सिनेमाच्या अडचणीत वाढ झाली असून निर्मात्यांना कायदेशीर नोटीस धाडण्यास आली आहे.
बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. खरंतर सोनम सध्या तिच्या बाळाकडे लक्ष देण्याकडे व्यस्त आहे. अशातच सोनम कपूरच्या आलिशान घराचे काही फोटो समोर आले आहेत.
'नवरा माझा नवसाचा' सिनेमाचा दुसरा भाग तब्बल 19 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर करत असून त्यांच्यासोबत जेष्ठ अभिनेते अशोक सराफ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसून येणार आहेत.
लग्नाच्या आठव्या वाढदिवसानिमित्त इरफान पठाणने पत्नी सफा बेगसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची खास गोष्ट म्हणजे यात त्याच्या पत्नीचा चेहरा झाकलेला नाही.
एबी डिव्हिलियर्सने त्याच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना सांगितले की विराट कोहली ठीक आहे आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे कारण अनुष्का दुसऱ्यांदा गरोदर आहे.
रामानंद सागर यांची लोकप्रिय मालिका ‘रामायण’ पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर प्रदर्शित केली जाणार आहे. या संदर्भातील एक पोस्ट दूरदर्शनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.
अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या इंस्टाग्रावरुन तिच्या मृत्यूची पोस्ट शेअर करण्यात आली होती. अशातच आता पूनमने ‘मी जिवंत’ असल्याची माहिती देत एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओवरवरुन पूनमला नेटकरी चांगलेच सुनावत आहेत.
शनिवारी सकाळी पूनमने स्वतः इंस्टाग्राम व्हिडीओ पोस्ट करत ‘मी जिवंत आहे’ असे शेअर केले आहे. सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती (Cervical Cancer Awareness) करण्यासाठी तिने स्वतःच्याच मृत्यूबाबत खोटी बातमी पसरवली असा तिचा दावा आहे.
अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचा गर्भाशयाच्या कॅन्सरने (Cervical Cancer) मृत्यू झाल्याची पोस्ट नुकतीच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आली होती. अशातच KRKकडून पूनम पांडेचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
साउथ सुपरस्टार थलिपति विजयने राजकरणात एण्ट्री केली आहे. याशिवाय विजयने स्वत: च्या राजकीय पक्षाची घोषणा देखील केली आहे.