मुहूर्त अन ठिकाणं ठरलं ! देशातील सर्वात मोठं लग्न या दिवशी पार पडणार ; अनंत अंबानी-राधिका मर्चेंट अडकणार लग्नबंधनात

| Published : May 30 2024, 02:26 PM IST

radhika anant second pre wedding bash

सार

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या शाही विवाहसोहळ्याची तारीख आता समोर आली आहे. 12 जुलै 2024 रोजी अनंत-राधिका लग्नबंधनात अडकणार आहेत.

देशातील सर्वात मोठ्या लग्न सोहळ्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून आहे. त्यामुळे याविषयीचे अपडेट प्रत्येक जण घेत असून सगळीकडे एकच प्रश्न विचारला जात आहे नेमकं लग्न कधी ? आता या लग्नाचा मुहूर्त आणि ठिकाण ठरलेलं असून सगळ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला आहे. अनंत-राधिका येत्या जुलै महिन्यात 12 तारखेला लग्नबंधनात अडकणार आहेत.हा विवाह शाही थाटात मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडणार आहे. या दिमाखदार लग्नसोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. तसेच आता वेडिंग कार्डचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मुहूर्त आणि ठिकाण :

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा लग्नसोहळा 12 जुलै 2024 रोजी मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडणार आहे. पारंपारिक हिंदू रितीरिवाजानुसार त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. 12 ते 14 जुलै दरम्यान त्यांचा लग्नसोहळा पार पडणार असल्याचे म्हंटले जात आहे.

राधिका अनंतचा लग्न सोहळा कसा होणार ?

अनंत-राधिका यांचा लग्नसोहळा 12 ते 14 जुलैदरम्यान पार पडणार आहे. 12 जुलैला शुभविवाह पार पडेल. 12 जुलैला शुभा आशिर्वाद आणि 14 जुलैला मंगल उत्सव पार पडणार आहे. तसेच मेहेंदी, हळद असे विधी देखील असणार आहेत.

असा असेल लग्नसोहळ्यातील ड्रेसकोड :

अनंत-राधिका यांच्या लग्नसोहळ्या दरम्यान ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. याप्रमाणे 12 जुलैसाठी पारंपारिक ड्रेसकोड ठेवण्यात आला आहे. तर 13 जुलैला इंडियन फॉर्मल असा ड्रेसकोड आहे. त्यानंतर 14 जुलैला भारतीय पेहराव ठेवण्यात आला आहे.

सध्या पार पडतोय दुसरा प्री-वेडिंग सोहळा :

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगचं आयोजन करण्यात आलं असून काल पासून या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. लग्झरी क्रूजवर या पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. क्रूझवर पार पडणाऱ्या या प्री-वेडिंगला बॉलिवूडसह जगभरातील अनेक दिग्गज मंडळीतीन दिवस हजेरी लावणार आहेत.

आणखी वाचा :

Rituparna Sengupta: अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ताच्या अडचणीत वाढ, या घोटाळ्याप्रकरणी ईडीने पाठवले समन्स

Paresh Rawal Birthday :करिअरची सुरुवात अभिनयातून नव्हे तर बँकिंगपासून, प्रेयसीकडून घेतले पैसे,स्टार बनण्यासाठी करावे लागले कष्ट