Entertainment News :भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी पहा 2024 मधील हे चित्रपट

| Published : May 30 2024, 04:01 PM IST

savarkar cover photo

सार

आज आम्ही तुम्हाला या वर्षी प्रदर्शित झालेल्या अशा दमदार चित्रपटांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळेतुम्हाला भारताचा इतिहास जाणून घेण्यात मदत होईल.जाणून घ्या वर्षी प्रदर्शित झालेले चित्रपट. 

भारतात इतिहासावरून अनेकवेळा वादंग निर्माण झाले आहे.खरा इतिहास कोणता खोटा इतिहास कोणता यामुळे अनेकवेळा नागरिकनांची दिशाभूल देखील झाली आहे. मात्र अनेकवेळा भारताच्या इतिहासात अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्याबद्दल तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील आणि तुम्हाला जाणून घेण्याची खूप उत्सुकता असेल. अशा परिस्थितीत आम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरे अशा चित्रपटांच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची छुपी उत्तरे सापडतील. आज आम्ही तुम्हाला 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या इतिहासावर आधारित चित्रपटांबद्दल सांगणार आहोत.

आर्टिकल 370 :

आदित्य धर दिग्दर्शित आर्टिकल 370 मध्ये यामी गौतम मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 2024 साली प्रदर्शित झाला आहे. यामी गौतम चित्रपटात गुप्तहेर आहे. या चित्रपटाची कथा काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेल्या कलम 370 ची कथा दर्शवते. कलम 370 कसे रद्द करण्यात आले हे जाणून घेण्यात तुम्हाला रस असेल तर हा चित्रपट नक्की पहा.

YouTube video player

स्वतंत्र वीर सावरकर :

स्वतंत्र वीर सावरकर या चित्रपटाचे दिग्दर्शन खुद्द अभिनेता रणदीप हुड्डा यांनी केले आहे. हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा विनायक दामोदर सावरकर इंग्लंडमधील शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर , जेव्हा ते देशाच्या स्वातंत्र्यात सक्रिय सहभाग घेतात आणि स्वातंत्र्याच्या मार्गात महत्त्वाची भूमिका बजावतात यावर संपूर्ण कथा मांडण्यात आली आहे. तसेच यासाठी रणदीप हूडाने भरपूर मेहनतही घेतली होती.

YouTube video player

जहांगीर राष्ट्रीय विद्यापीठ :

2024 मध्ये रिलीज झालेला JNU रिलीज होण्यापूर्वी खूप वादात सापडला होता. कारण त्याची कथा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची आहे, ज्याचे नामकरण जहांगीर राष्ट्रीय विद्यापीठ असे करण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा जेएनयू विद्यापीठातील सौरभ या विद्यार्थ्याची आहे. जो विद्यापीठात अनेक डाव्या विचारसरणीच्या लोकांना भेटतो आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो.

YouTube video player

मैं अटल हूं :

मैं अटल हूं… हा 2024 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आहे. अटलबिहारी वाजपेयींनी भाजपची स्थापना कशी केली आणि पक्ष पुढे कसा नेला हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटातून तुम्हाला अटलबिहारी वाजपेयी यांची संपूर्ण जीवनकथा थोडक्यात जाणून घेता येईल.यात अटल बिहारींची भूमिका प्रख्यात अभिनेता पंकज त्रिपाठीने साकारली आहे. 

YouTube video player

आणखी वाचा :

या अभिनेत्री घटस्फोटानंतरही जगतं आहे रॉयल आयुष्य, जाणून घ्या सविस्तर

मुहूर्त अन ठिकाणं ठरलं ! देशातील सर्वात मोठं लग्न या दिवशी पार पडणार ; अनंत अंबानी-राधिका मर्चेंट अडकणार लग्नबंधनात