अमेठी लोकसभा मतदारसंघातून स्मृती इराणी या पिछाडीवर असून त्यांच्यासमोर काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांचं आव्हान आहे आणि यात किशोरी लाला विजयी होताना दिसत आहे.
दरम्यान, बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून ईव्हीएम मशीनबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे. ज्याची खूप चर्चा होत आहे. रितेश देशमुख हा अशा कलाकारांपैकी एक आहे जो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.
मतदानाच्या 6 आठवड्यांनंतर, 2024 च्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होत असून, सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, टीव्ही अभिनेता अली गोनीने मतमोजणीसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर तो ट्रोल झाला होता.
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन वडील तर नताशा आई बनली आहे. काही तासांपूर्वीच नताशाने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे.बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी खुलासा केला आहे की त्यांच्या घरी लक्ष्मीचा जन्म झाला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने भाजपकडू हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवली आहे. तिने विद्यमान खासदारांच्या पुत्राला चांगल्याच मताधिक्याने मागे टाकले आहे. जाणून घ्या सविस्तर…
तेलगू अभिनेत्री हेमाला केंद्रीय गुन्हे शाखेने अटक केली आहे. रेव्ह पार्टी प्रकरणी चौकशी केल्यानंतर तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या पार्टीत जवळपास 86 लोकांनी ड्रग्जचे सेवन केले होते.
ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच ॲमेझॉनवर ऑफकॉमच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा उल्लंघन 2022 च्या फिलिपिनो चित्रपट पमासाहेशी संबंधित आहे, जो काही महिन्यांपूर्वी प्राइमवर प्रदर्शित झाला होता.
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीत जॉनी डेप उपस्थित होता का? व्हायरल झालेल्या व्हिडिओने लोकांमध्ये गोंधळ निर्माण केला आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीचा शाहरुख खान जॉनी डेपसारखा दिसत असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे.
अनंत आणि राधिकाच्या दुसऱ्या प्री वेडिंग साठी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींची मांदियाळी यावेळी इटली येथे पाहायला मिळाली. पण त्यातील काहींनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत पहा सविस्तर.
गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि नाताशा स्टेनकोविक यांच्यामध्ये घटस्फोट होणार असल्याच्या बातम्यांनी जोर पकडला होता. अशातच अभिनेत्रीने घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे.