MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Daily Use Items Cheap at Dmart
Groundnut Oil Vs Sunflower Oil
Petrol Vs CNG Vs EV Cars
Petrol & Diesel Price Today
Steel Water Bottle Cleaning Tips
Royal Enfield Classic 350 Mileage
EPFO WhatsApp Services
Sanju Samson
SIP Calculator
Best 7 Seater Family Cars Under 15 Lakhs
Gold Rate Today
8th Pay Commission
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • lifestyle
  • Kidney Failure : किडनी निकामी होण्याची ही १० लक्षणं चुकूनही दुर्लक्षित करू नका! ओढवू शकतो मृत्यू

Kidney Failure : किडनी निकामी होण्याची ही १० लक्षणं चुकूनही दुर्लक्षित करू नका! ओढवू शकतो मृत्यू

किडनी जेव्हा रक्तातून विषारी घटक आणि अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याची क्षमता गमावते, तेव्हा किडनी निकामी होण्यासारखी गंभीर परिस्थिती ओढवते.

3 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 18 2026, 05:01 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
112
किडनी संबधित समस्या
Image Credit : Getty

किडनी संबधित समस्या

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, जगभरात लाखो लोक क्रॉनिक किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. किडनी जेव्हा रक्तातून विषारी घटक गाळून बाहेर काढण्याची क्षमता गमावते, तेव्हा ही समस्या निर्माण होते. वेळेवर उपचार न केल्यास किडनी पूर्णपणे निकामी होऊ शकते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
212
योग्य वेळी काळजी
Image Credit : Getty

योग्य वेळी काळजी

मोठा धोका टाळण्यासाठी किडनीची समस्या वेळीच ओळखणं खूप गरजेचं आहे. कारण, किडनीचं मोठं नुकसान होईपर्यंत याची लक्षणं सहसा दिसून येत नाहीत. पण काही प्राथमिक लक्षणं ओळखून जीवनशैलीत बदल केल्यास किडनी निकामी होण्यापासून वाचवता येते. जाणून घेऊया अशी काही लक्षणं, जी तुम्ही अजिबात दुर्लक्षित करू नयेत.

Related Articles

Related image1
Lung Health : फुफ्फुस राहतील हेल्ही, हे 8 सुपरफूड्स करतील कमाल!
Related image2
Liver Health : 500 पेक्षा जास्त कामं करणाऱ्या लिव्हरसाठी हे 5 पदार्थ आहेत वरदान
312
लक्षणे
Image Credit : Getty

लक्षणे

किडनी निकामी होण्याचं पहिलं लक्षण म्हणजे खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणं. किडनीचं काम बिघडल्यास शरीरात विषारी घटक साचू लागतात. यामुळे ॲनिमियाचा (रक्ताल्पता) त्रास सुरू होतो. रुग्णाला सतत थकवा आणि चक्कर येते, अगदी रोजची साधी कामं करणंही कठीण होऊन बसतं.

412
अन्य लक्षणे
Image Credit : Getty

अन्य लक्षणे

पाय, घोटे आणि हातांवर सूज येणं हे किडनी खराब होण्याचं एक प्रमुख लक्षण आहे. किडनीने नीट काम न केल्यास शरीरात अतिरिक्त पाणी साचायला सुरुवात होते. यामुळे शरीराच्या खालच्या भागात, विशेषतः पाय आणि घोट्यांमध्ये पाणी साचून सूज येते. अनेकदा चेहरा आणि हातांवरही ही सूज दिसून येते.

512
हे देखील वाचा
Image Credit : Getty

हे देखील वाचा

लघवीच्या सवयीत अचानक बदल झाल्यास सावध होणं गरजेचं आहे. वारंवार लघवीला लागणं (विशेषतः रात्री), लघवीचा रंग गडद होणं, फेस किंवा रक्त येणं ही किडनी निकामी होण्याची लक्षणं आहेत. तसेच भरपूर पाणी पिऊनही लघवीचं प्रमाण कमी होणं हा देखील धोक्याचा इशारा आहे.

612
मळमळ आणि उलट्या
Image Credit : Getty

मळमळ आणि उलट्या

सतत मळमळणं आणि उलट्या होणं हे किडनी निकामी होण्याचं लक्षण असू शकतं. रक्तात विषारी घटक साचल्यास मळमळ आणि भूक मंदावण्यासारख्या समस्या निर्माण होतात. यामुळे शरीराला पुरेसं पोषण आणि ऊर्जा मिळत नाही, परिणामी रुग्ण हळूहळू कमकुवत होत जातो.

712
श्वास घेण्यास त्रास होणं
Image Credit : Getty

श्वास घेण्यास त्रास होणं

श्वास घेण्यास त्रास होणं हे किडनी खराब होण्याचं आणखी एक मोठं लक्षण आहे. किडनी निकामी होऊ लागल्यास फुफ्फुसांमध्ये अतिरिक्त पाणी साचू लागतं. यामुळे थोडंसं काम केलं तरी रुग्णाची दमछाक होते. याशिवाय ॲनिमियामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊनही श्वासोच्छवासाचा त्रास वाढतो.

812
त्वचेला खूप जास्त खाज आणि कोरडेपणा
Image Credit : Getty

त्वचेला खूप जास्त खाज आणि कोरडेपणा

त्वचेला खूप जास्त खाज आणि कोरडेपणा जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. किडनी आपल्या रक्तातील विषारी घटक बाहेर काढण्याचं काम करते. पण किडनी निकामी झाल्यास शरीरात हे विषारी घटक साचू लागतात. यामुळे त्वचा अत्यंत कोरडी पडते आणि भयंकर खाज सुटून अस्वस्थता वाढते.

912
स्नायूंमध्ये पेटके येणं आणि अशक्तपणा जाणवणं
Image Credit : Getty

स्नायूंमध्ये पेटके येणं आणि अशक्तपणा जाणवणं

स्नायूंमध्ये पेटके येणं आणि अशक्तपणा जाणवणं हे किडनीच्या आजाराचं प्रमुख लक्षण आहे. किडनीची समस्या निर्माण झाल्यास शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन बिघडतं, विशेषतः पोटॅशियम आणि कॅल्शियमची पातळी कमी होते. यामुळे स्नायूंमध्ये भयंकर वेदना, पेटके आणि अशक्तपणा जाणवू लागतो.

1012
रक्तात विषारी घटकांचं प्रमाण वाढल्यास...
Image Credit : pinterest

रक्तात विषारी घटकांचं प्रमाण वाढल्यास...

रक्तात विषारी घटकांचं प्रमाण वाढल्यास त्याचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यावर होतो. यामुळे रुग्णाची स्मरणशक्ती कमी होते, गोंधळ उडतो आणि कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करणं कठीण जातं. परिस्थिती गंभीर झाल्यास रुग्ण खूप जास्त झोपतो किंवा कोमातही जाऊ शकतो.

1112
रक्तात अतिरिक्त विषारी घटक साचल्यास
Image Credit : Getty

रक्तात अतिरिक्त विषारी घटक साचल्यास

रक्तात अतिरिक्त विषारी घटक साचल्यास (युरेमिया) तोंडाची चव धातूसारखी (मेटॅलिक) होते. यामुळे तोंडाला दुर्गंधी येते आणि अनेकदा तोंडात फोडही येतात. या समस्येमुळे रुग्णाची जेवणाची इच्छा पूर्णपणे नाहीशी होते.

1212
उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा धोका
Image Credit : Pixabay

उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा धोका

किडनी शरीरातील सोडियम आणि पाण्याचा समतोल राखून रक्तदाब नियंत्रित ठेवते. पण किडनीने नीट काम न केल्यास रक्तदाब अचानक वाढतो. आणि उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा धोकाही लक्षणीयरीत्या वाढतो.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Breastfeeding Diet : स्तनदा मातांनी आहारात नक्की घ्यावेत हे ७ पदार्थ
Recommended image2
Goa Food Guide : गोव्यात जाताय? या ५ रेस्टॉरंट्सना नक्की भेट द्या
Recommended image3
रताळे, दूध आणि गूळ एकत्र खाण्याचे हे भन्नाट फायदे माहीत आहेत का?
Recommended image4
Contagious Yawning : दुसऱ्याला जांभई देताना पाहून आपल्यालाही जांभई का येते?
Recommended image5
शरीरातील व्हिटॅमिन सी ची कमतरता भरून काढण्यासाठी खा हे ७ पदार्थ
Related Stories
Recommended image1
Lung Health : फुफ्फुस राहतील हेल्ही, हे 8 सुपरफूड्स करतील कमाल!
Recommended image2
Liver Health : 500 पेक्षा जास्त कामं करणाऱ्या लिव्हरसाठी हे 5 पदार्थ आहेत वरदान
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved