MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Steel Water Bottle : स्टीलची बाटली वापरताय? मग ही चूक अजिबात करू नका

Steel Water Bottle : स्टीलची बाटली वापरताय? मग ही चूक अजिबात करू नका

तुम्ही रोज स्टीलची पाण्याची बाटली वापरता का? ती नीट साफ केली नाही तर बॅक्टेरिया आणि दुर्गंधीची समस्या होऊ शकते. बाटली सुरक्षितपणे कशी साफ करावी आणि वापरावी, याच्या सोप्या टिप्स जाणून घ्या.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 17 2026, 02:06 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
स्टिल बाटली
Image Credit : social media

स्टिल बाटली

प्लास्टिकला पर्याय म्हणून आजकाल अनेकजण स्टीलची पाण्याची बाटली वापरतात. ऑफिस, शाळा, कॉलेज किंवा जिममध्ये सगळीकडे स्टीलच्या बाटल्या दिसतात. या बाटल्या दीर्घकाळ टिकतात आणि पर्यावरणासाठीही चांगल्या असतात. पण फक्त स्टीलची बाटली विकत घेतली म्हणजे ती सुरक्षित झाली असे नाही. आपण ती कशी साफ करतो हे खूप महत्त्वाचे आहे. बाटलीची योग्य काळजी घेतली नाही, तर त्यात जंतू वाढण्याची शक्यता असते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
बॅक्टेरिया वाढण्याचा धोका
Image Credit : Chatgpt

बॅक्टेरिया वाढण्याचा धोका

आपण बाटलीला थेट तोंड लावून पाणी पितो, तेव्हा तोंडातील लाळ आणि सूक्ष्मजंतू बाटलीत जातात. तसेच, न धुतलेल्या हातांनी बाटलीचे झाकण उघडल्यास तिथेही घाण साचते.

पाणी पिल्यानंतर बाटली तशीच बंद करून ठेवली, तर आतील ओलाव्यामुळे बॅक्टेरिया वेगाने वाढतात. अशा वातावरणात सूक्ष्मजंतू सहज वाढू शकतात.

बाटलीचे तोंड, झाकणाची आतील बाजू, सिलिकॉन रिंग, स्ट्रॉ आणि तळाशी घाण साचण्याची शक्यता जास्त असते. काही वेळा तिथे न दिसणारा 'बायोफिल्म' नावाचा थरही तयार होतो.

Related Articles

Related image1
Water Bottle : प्लास्टिक, स्टील की तांबं? तुमच्या आरोग्यासाठी कोणती बाटली बेस्ट? जाणून घ्या
35
आतून स्वच्छ धुणं गरजेचं
Image Credit : Chatgpt

आतून स्वच्छ धुणं गरजेचं

अनेकजण बाटलीत फक्त पाणी टाकून ती विसळतात आणि पुन्हा वापरतात. ही खूप मोठी चूक आहे. तुम्ही बाटलीत चहा, कॉफी, ज्यूस, दूध किंवा प्रोटीन शेक नेत असाल, तर त्याचे कण आत चिकटून राहतात. साखर आणि प्रोटीनचे कण शिल्लक राहिल्यास तिथे सूक्ष्मजंतू वेगाने वाढतात. त्यामुळे बाटली वापरल्यानंतर ती आतून स्वच्छ धुणे अत्यंत गरजेचे आहे.

45
डिप क्लिनिंग करणं गरजेचं
Image Credit : stockPhoto

डिप क्लिनिंग करणं गरजेचं

रोज स्वच्छ करा - बाटली रिकामी झाल्यावर कोमट पाणी आणि डिशवॉश लिक्विड टाकून ती ब्रशने आतून चांगली घासा.

झाकण विसरू नका - फक्त बाटली धुवून चालणार नाही. झाकणातील सिलिकॉन रिंग किंवा स्ट्रॉ काढून तेही स्वच्छ करा, कारण तिथे ओलावा आणि घाण साचते.

चांगली वाळवा - धुतल्यानंतर बाटली लगेच बंद करू नका. ती उघडी आणि उलटी ठेवून पूर्णपणे वाळू द्या. ओलावा जास्त काळ राहू देऊ नका.

आठवड्यातून एकदा डीप क्लिनिंग - बाटलीला वास येत असेल, तर कंपनीने दिलेल्या सूचनांनुसार ती साफ करा. काही बाटल्यांसाठी बेकिंग सोडा वापरता येतो, पण प्रत्येक बाटलीसाठी एकच पद्धत लागू होत नाही.

55
स्टिलची बाटली धोकादायक नाही, पण अस्वच्छ ठेवणं गरजेचं
Image Credit : Chatgpt

स्टिलची बाटली धोकादायक नाही, पण अस्वच्छ ठेवणं गरजेचं

स्टीलची बाटली आयुष्यभर टिकेल असा विचार करू नका. बाटलीला आतून गंज लागला असेल, खोल ओरखडे पडले असतील, कोटिंग खराब झाले असेल किंवा झाकण तुटले असेल, तर ती लगेच बदला. झाकण नीट साफ करता येत नसेल, तरीही नवीन झाकण घेणे सुरक्षित ठरते.

स्टीलची बाटली धोकादायक नसते, पण ती अस्वच्छ ठेवल्यास आजार होऊ शकतात.

रोज फक्त एक मिनिट काढून बाटली स्वच्छ धुतली आणि वाळवली, तर तुमचे आरोग्य सुरक्षित राहील. बाटली कोणत्या धातूची आहे यापेक्षा आपण तिची काळजी कशी घेतो, हे जास्त महत्त्वाचे आहे!

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Instant Curd : फक्त १ तासात बनवा घट्ट आणि मलाईदार दही! जाणून घ्या ही सोपी ट्रिक
Recommended image2
Best Air Fryers : दिवाळी 2026 साठी बजेटमधील ५ बेस्ट एअर फ्रायर्स, ॲमेझॉनवर मिळतायत भन्नाट डील्स
Recommended image3
कोणत्याही ड्रेसवर मॅच होतील असे 7 ट्रेंडी फ्लॅट फूटवेअर
Recommended image4
Horoscope 13th October 2026 : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या राशीभविष्य
Recommended image5
Goddess Durga Mantras : दुर्गा देवीचे 9 पॉवरफुल मंत्र... जपल्यास धन आणि ऐश्वर्य वाढेल, अत्यंत लाभदायक
Related Stories
Recommended image1
Water Bottle : प्लास्टिक, स्टील की तांबं? तुमच्या आरोग्यासाठी कोणती बाटली बेस्ट? जाणून घ्या
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved