MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • SIP Calculator : १ कोटी रुपये जमवण्यासाठी दर महिन्याला किती SIP करावी? समजून घ्या सोपं गणित

SIP Calculator : १ कोटी रुपये जमवण्यासाठी दर महिन्याला किती SIP करावी? समजून घ्या सोपं गणित

शेअर बाजारात सध्या चढ-उतार दिसत असले तरी, लॉंग टर्ममध्ये मोठी रक्कम उभी करण्यासाठी अनेक जण म्युच्युअल फंडातील SIP चा मार्ग निवडतात. नियमित गुंतवणुकीतून तुम्ही निवृत्तीसाठी किंवा इतर मोठ्या आर्थिक ध्येयांसाठी निधी जमा करू शकता.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 12 2026, 02:50 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
SIP कॅल्युकेटर
Image Credit : pr

SIP कॅल्युकेटर

अनेक गुंतवणूकदारांचं १ कोटी रुपयांचा फंड तयार करण्याचं स्वप्न असतं. पण हे ध्येय गाठण्यासाठी दर महिन्याला किती रुपयांची SIP करावी लागेल? नियमित गुंतवणुकीतून निवृत्तीसाठी किंवा इतर मोठी आर्थिक ध्येये पूर्ण करणं शक्य आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
एसआयपीमधून रिटर्न्स
Image Credit : ANI

एसआयपीमधून रिटर्न्स

समजा, म्युच्युअल फंडातून तुम्हाला लॉंग टर्ममध्ये सरासरी १२% वार्षिक परतावा मिळतोय. या हिशोबाने, तुम्ही २० वर्षांसाठी दरमहा १०,००० रुपयांची SIP केल्यास तुमची एकूण गुंतवणूक २४ लाख रुपये होईल. १२% वार्षिक परतावा गृहीत धरल्यास, २० वर्षांनंतर या गुंतवणुकीचं मूल्य सुमारे ९१.९९ लाख रुपये होऊ शकतं. म्हणजेच, तुम्हाला गुंतवणुकीवर अंदाजे ६७.९९ लाख रुपयांचा नफा मिळू शकतो.

Related Articles

Related image1
Train Lower Berth : ट्रेनमध्ये हवाय लोअर बर्थ? या 5 ट्रिक्स वापरून बघा, सीट नक्की मिळेल!
Related image2
Business Idea : 3 लाखांचा iPhone Duo घेण्याऐवजी हा व्यवसाय करा, महिन्याला 30,000 कमवा
36
कोट्यावधी रुपयांच्या फंडासाठी काय करावे?
Image Credit : our own

कोट्यावधी रुपयांच्या फंडासाठी काय करावे?

जर तुम्हाला १५ वर्षांत सुमारे १ कोटी रुपयांचा फंड तयार करायचा असेल, तर तुम्हाला दरमहा २०,००० रुपयांची SIP करावी लागेल. १५ वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक ३६ लाख रुपये होईल. १२% वार्षिक परतावा गृहीत धरल्यास, या गुंतवणुकीचं मूल्य सुमारे ९५.१९ लाख रुपये होऊ शकतं. म्हणजेच, परताव्यामधून अंदाजे ५९.१९ लाख रुपये येऊ शकतात.
46
दरवर्षी गुंतवणूकीची रक्कम वाढवा
Image Credit : magnific

दरवर्षी गुंतवणूकीची रक्कम वाढवा

SIP सोबत दरवर्षी गुंतवणुकीची रक्कम वाढवल्यास, म्हणजेच स्टेप-अप SIP केल्यास, तुमचं ध्येय आणखी लवकर पूर्ण होऊ शकतं. तुम्ही दरमहा १०,००० रुपयांनी SIP सुरू करून दरवर्षी गुंतवणुकीत १०% वाढ केल्यास, सुमारे १३ वर्षांतच १ कोटी रुपयांचा फंड तयार होऊ शकतो.
56
कमी पैशांत करू शकता सुरुवात
Image Credit : magnific

कमी पैशांत करू शकता सुरुवात

अगदी ५,००० रुपयांच्या मासिक SIP ने सुरुवात करून आणि दरवर्षी त्यात १०% वाढ केल्यास, सुमारे १५ वर्षे आणि काही महिन्यांत तुम्ही १ कोटी रुपयांच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता.
66
एसआयपीमध्ये गुंतवणूक
Image Credit : Gemini

एसआयपीमध्ये गुंतवणूक

मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की म्युच्युअल फंडातील परतावा पूर्णपणे बाजारातील कामगिरीवर अवलंबून असतो. १२% परतावा हा निश्चित किंवा गॅरंटीड नसतो. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमची आर्थिक ध्येयं आणि जोखीम घेण्याची क्षमता नक्की तपासा.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Train Lower Berth : ट्रेनमध्ये हवाय लोअर बर्थ? या 5 ट्रिक्स वापरून बघा, सीट नक्की मिळेल!
Recommended image2
WhatsApp Hack : इंटरनेट चालू, पण व्हॉट्सॲपवर सिंगल टिक! ही जबरदस्त ट्रिक तुम्हाला माहीत आहे का?
Recommended image3
WhatsApp Trick: नेट चालू असूनही WhatsApp वर सिंगल टिक हवीये? मग ही जबरदस्त ट्रिक तुमच्यासाठीच!
Recommended image4
Business Idea : 3 लाखांचा iPhone Duo घेण्याऐवजी हा व्यवसाय करा, महिन्याला 30,000 कमवा
Recommended image5
S-Presso Sales: मारुतीच्या सर्वात स्वस्त गाडीला मोठा झटका! महिन्याभरात फक्त १०७ गाड्या विकल्या
Related Stories
Recommended image1
Train Lower Berth : ट्रेनमध्ये हवाय लोअर बर्थ? या 5 ट्रिक्स वापरून बघा, सीट नक्की मिळेल!
Recommended image2
Business Idea : 3 लाखांचा iPhone Duo घेण्याऐवजी हा व्यवसाय करा, महिन्याला 30,000 कमवा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved