मुंबई - इन्स्टाग्राम रील्स आणि YouTube शॉर्ट्स सारखे छोटे व्हिडिओ सतत बघणं मेंदूसाठी धोकादायक असल्याचं नवीन संशोधनातून समोर आलं आहे. याचे शरीरावर नेमके काय दुष्परिणाम होतात ते जाणून घ्या.
- Home
- India
- 14Th July 2025 Updates: Reels Shorts Addiction - एकाग्रता कमी होते, निद्रानाश आणि नैराश्याचा वाढतो धोका
14Th July 2025 Updates: Reels Shorts Addiction - एकाग्रता कमी होते, निद्रानाश आणि नैराश्याचा वाढतो धोका

14Th July 2025 Updates : श्रावणातील आज पहिला सोमवार असल्याने भाविकांची शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी होत आहे. याशिवाय दिल्लीत पावसाच्या सरी कोसळत असून मुंबईत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. याशिवाय महाराष्ट्रात प्रविण गायकवाड यांचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. अशाच ताज्या घडामोडींसाठी एशियानेट न्यूज मराठीचे अपडेट्स एका क्लिकवर वाचा...
14Th July 2025 Updates Reels Shorts Addiction - एकाग्रता कमी होते, निद्रानाश आणि नैराश्याचा वाढतो धोका
14Th July 2025 Updates Samosa Jalebi Health Warning By Govt - समोसा-जिलेबी खाताना सावधान! आता सरकारच देणार थेट 'हेल्थ वॉर्निंग'!
Samosa Jalebi Health Warning By Govt : सरकार लवकरच सरकारी संस्थांमध्ये समोसा, जिलेबीसारख्या पदार्थांवर साखर आणि फॅटचे प्रमाण दर्शवणारे फलक लावणार आहे. तंबाखूच्या पाकिटांप्रमाणेच हे फलक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करतील.
14Th July 2025 Updates Raj Thackeray - राज ठाकरेंचा 'मराठी मेळाव्या'वर स्पष्टवक्ता सूर, "राजकारणाशी संबंध नाही!"; युतीचा सस्पेन्स कायम
Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी इगतपुरीत मराठी मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये राजकीय चित्र पाहून युतीचा निर्णय घेणार असून, त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत अनिश्चितता निर्माण झाली
14Th July 2025 Updates Mumbai Airport Plane Accident - मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला, अकासा एअरच्या विमानाला मालवाहू ट्रकची धडक; उड्डाण रद्द!
Mumbai Airport Plane Accident : मुंबई विमानतळावर अकासा एअरलाइन्सच्या विमानाला मालवाहू ट्रकची धडक बसली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु विमान आणि ट्रकचे नुकसान झाले. प्रवाशांना पर्यायी विमानाने दिल्लीला पाठवण्यात आले.
14Th July 2025 Updates Urmila Matondkar - ''रंगीला गर्ल'' उर्मिलाचा नवा लूक, जाणून घ्या चाहते काय म्हणाले?
मुंबई - उर्मिला मातोंडकर काल (ता. १३) रात्री मनीष मल्होत्राच्या घराबाहेर दिसली. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि तिच्या नव्या लूकवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
14Th July 2025 Updates CM Fadnavis On Jayant Patil - फडणवीसांचा जयंत पाटलांना चिमटा, "मोदींच्या योजना आता आवडू लागल्या?"; विधानसभेत रंगला कलगीतुरा!
CM Fadnavis On Jayant Patil : विधिमंडळात जयंत पाटील यांनी कामगारांना दिल्या जाणाऱ्या भांड्यांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाटलांना मिश्किल टोला लगावला आणि चौकशी समिती स्थापन करण्याची ग्वाही दिली.
14Th July 2025 Updates Indian Astronaut Shubhanshu Shukla Return - काउंटडाऊन सुरु, शुभांशू शुक्ला मंगळवारी पृथ्वीवर परतणार; भारताचा अवकाश अभिमान गगनाला भिडणार!
Indian Astronaut Shubhanshu Shukla Return : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) गाठणारे पहिले भारतीय अंतराळवीर, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, आज पृथ्वीवर परतत आहेत. १८ दिवसांच्या अंतराळ वास्तव्यात त्यांनी ६० हून अधिक शास्त्रीय प्रयोग केले.
14Th July 2025 Updates लाखोंच्या एलपीएसाठी डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याची गरज नाही! हे आहेत २०२५ मधील टॉप ट्रेंडिंग करिअर
मुंबई - चांगल्या करिअरसाठी आणि जास्त पगारासाठी डॉक्टर किंवा इंजिनिअर होणं आवश्यक आहे. पण २०२५ मध्ये हे समीकरण झपाट्याने बदलत आहे. आता अशाही अनेक करिअर संधी आहेत जिथे फक्त तुमच्या कौशल्य, कल्पकता आणि जिद्दीच्या बळावर लाखोंचा पगार मिळवू शकता.
14Th July 2025 Updates Gold Rate Today - आज सोमवारी सोन्याच्या दर वाढ, जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर येथील दर
मुंबई - भारतीय आणि सोने हे एक वेगळेच नाते आहे. त्यामुळेच सणावाराला सोने खरेदीवर भर दिला जातो. फक्त दागिन्यांसाठीच नाही तर गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहिले जाते. म्हणूनच सोन्याच्या दराबाबत ते नेहमीच उत्सुकता दिसून येते.
14Th July 2025 Updates एमपीएससीची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघातात झाला मृत्यू, पुण्याच्या दिशेने जाताना ताम्हणी घाटात घडली दुर्घटना
14Th July 2025 Updates कोण आहे मॉडेल सान रॅचेल? मिस वल्ड ब्लॅक ब्यूटी विनरचा सापडला मृतदेह, पोलिसांना आत्महत्येचा संशय
मुंबई - काळ्या रंगाची मॉडेल सान रॅचेलने अनेक पुरस्कार जिंकून मॉडेलिंग क्षेत्रात यश मिळवले होते. झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन केल्याने तिचा मृत्यू असल्याचे सांगितले जात आहे. कर्जबाजारीपणामुळे ती मानसिक तणावाखाली होती. जाणून घ्या तिच्याबद्दल…
14Th July 2025 Updates Saina Nehwal Divorce - सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांच्या करिअरचे तुलनात्मक विश्लेषण
दोघांचे वैयक्तिक आयुष्य काही काळ एकत्र आले असले, तरी त्यांचे करिअर त्यांच्या स्वतंत्र यशाची आणि संघर्षाची गोष्ट सांगते. चला पाहूया या दोघांच्या बॅडमिंटन प्रवासाची तुलनात्मक झलक.
14Th July 2025 Updates Saina Nehwal Divorce - सायनाची रास मीन तर पारुपल्लीची मेष, जाणून घ्या या दोन राशींमधील नातेसंबंधांबद्दल ज्योतिषशास्त्र काय म्हणतंय
मुंबई - सायना नेहवालची राशी मीन आहे तर तिचा नवरा पारुपल्ली कश्यप यांची राशी मेष आहे. या दोघांच्या राशिंमधील विवाहसंबंध आणि इतर गुणधर्माबद्दल ज्योतिषशास्त्रात काय सांगितले आहे, ते जाणून घ्या...
14Th July 2025 Updates Saina Nehwal Divorce - सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांची संपत्ती किती, कशी सुरु झाली होतो लव्हस्टोरी
दोघेही जागतिक दर्जाचे खेळाडू असून त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत मोठमोठी पदके जिंकली आहेत. त्यांच्या कौशल्यासोबतच त्यांनी मोठ्या प्रमाणावर संपत्ती, प्रसिद्धी आणि ब्रँड व्हॅल्यू कमावली आहे.
14Th July 2025 Updates Mumbai Crime News - मुंबईतील निवृत्त प्राध्यपाकाचा फेसबुकवरील मैत्रीणीनेच केला घात, लावला 1.93 कोटींचा चुना
मुंबईत एका निवृत्त प्राध्यकापाला फेसबुकवरील मैत्रीणीने कोट्यावधींचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
14Th July 2025 Updates Mumbai Weather Update - मुंबईत आज मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज, वाचा हवामान खात्याचे अपडेट
मुंबई : मुंबईत आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असली तरीही मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत. याशिवाय वातावरणात उच्च आर्द्रता राहिल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
14Th July 2025 Updates Saina Nehwal Divorce - भारतातील या प्रसिद्ध खेळाडूंनीही घेतलाय घटस्फोट, दहाव्या खेळाडूचे नाव वाचून बसेल धक्का
जवळपास सात वर्षांच्या (2018–2025) विवाहाचा शेवट करत दोघांनीही ही घोषणा परस्पर सल्ल्याने, शांततेच्या आणि स्वतःच्या वाढीसाठी करत असल्याचे त्यांनी Instagram वरून स्पष्ट केले.
14Th July 2025 Updates सात वर्षांचा संसार मोडला, सायना नेहवालने पारुपल्ली कश्यपसोबत घेतला घटस्फोट
सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली असून वैयक्तिक कारणांमुळे घटस्फोट घेत असल्याचे म्हटले आहे. २०१८ मध्ये त्यांचे लग्न झाले होते.
14Th July 2025 Updates सात वर्षांचा संसार मोडला, सायना नेहवालने पारुपल्ली कश्यपसोबत घेतला घटस्फोट
सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली असून वैयक्तिक कारणांमुळे घटस्फोट घेत असल्याचे म्हटले आहे. २०१८ मध्ये त्यांचे लग्न झाले होते.
14Th July 2025 Updates संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शरद पवारांचा फोन
राज्यातील ग्रामीण भागात फुले-शाहू-आंबेडकरी विचारांची मशाल तेवत ठेवणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर रविवारी अक्कलकोट (जि. सोलापूर) येथे हल्ला करण्यात आला. शिवधर्म फाऊंडेशन या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर वंगण टाकून चेहरा काळा करण्याचा प्रकार केला. यावर शरद पवारांनी प्रविण गायकवाड यांना फोन केला.