- Home
- Utility News
- आकर्षक LPA साठी डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याची गरज नाही! हे आहेत २०२५ मधील टॉप ट्रेंडिंग करिअर
आकर्षक LPA साठी डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याची गरज नाही! हे आहेत २०२५ मधील टॉप ट्रेंडिंग करिअर
मुंबई - चांगल्या करिअरसाठी आणि जास्त पगारासाठी डॉक्टर किंवा इंजिनिअर होणं आवश्यक आहे. पण २०२५ मध्ये हे समीकरण झपाट्याने बदलत आहे. आता अशाही अनेक करिअर संधी आहेत जिथे फक्त तुमच्या कौशल्य, कल्पकता आणि जिद्दीच्या बळावर लाखोंचा पगार मिळवू शकता.

२०२५ मध्ये उच्च पगार देणाऱ्या टॉप करिअर पर्यायांची माहिती
ही करिअर्स पारंपरिक नोकऱ्यांप्रमाणे केवळ पदव्यांवर आधारित नसून, तुमच्या स्किल्स, डिजिटल क्षमता आणि इनोव्हेशनवर अवलंबून आहेत. २०२५ मध्ये पुढील ५ करिअर्स सर्वाधिक मागणीत असून सुरुवातीला ६–१० लाख वार्षिक पगार मिळतो आणि पुढे अनुभव व कौशल्य वाढल्यास १५–३० लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
1.ॲनिमेशन आणि गेम डिझाईन
OTT प्लॅटफॉर्म, मोबाईल गेम्स आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) चा वेग वाढल्यामुळे अॅनिमेटर आणि गेम डिझायनर्सची मागणी जोरात वाढली आहे.
शैक्षणिक पात्रता: B.Des, BFA किंवा अॅनिमेशन डिप्लोमा (Arena, MAAC सारख्या संस्थांतून)
पगार: सुरुवातीला ४–८ LPA, अनुभवावर १५+ LPA पर्यंत
2. एथिकल हॅकिंग आणि सायबरसुरक्षा
आज प्रत्येक कंपनीसाठी डेटा आणि डिजिटल सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य आहे. एथिकल हॅकर्स ही लोकं कायदेशीर मार्गाने सिस्टिममधील त्रुटी शोधतात आणि सुरक्षा मजबूत करतात.
शैक्षणिक पात्रता: BCA/MCA + CEH, OSCP सारख्या सर्टिफिकेशन
पगार: सुरुवात ८–१० LPA, अनुभवानुसार ३०+ LPA
3. डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी
सोशल मिडिया आणि ई-कॉमर्सच्या काळात डिजिटल मार्केटिंग ही प्रत्येक ब्रँडसाठी अपरिहार्य झाली आहे. यामध्ये कंटेंट, SEO, सोशल मिडिया, ब्रँडिंग अशा विविध भूमिका असतात.
शैक्षणिक पात्रता: कोणतीही पदवी, Google, Meta, Coursera सारख्या संस्थांमधून सर्टिफिकेशन
पगार: सुरुवातीला ५–८ LPA, पुढे २०+ LPA
4. प्रॉडक्ट मॅनेजमेंट
प्रॉडक्ट मॅनेजर ग्राहकांच्या गरजा आणि व्यवसायाच्या उद्दिष्टांमध्ये समन्वय साधतो. टेक कंपन्यांमध्ये ही भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
शैक्षणिक पात्रता: MBA, BBA किंवा इंजिनिअरिंग, तसेच Google/Product School सारखी सर्टिफिकेशन
पगार: सुरुवात १०–१२ LPA, अनुभवानुसार ३० LPA पर्यंत
5. फूड टेक्नोलॉजी आणि न्यूट्रिशन सायन्स
सतत वाढणाऱ्या आरोग्य-जागरूकतेमुळे न्यूट्रिशन आणि फूड टेक्नॉलॉजीचा व्यवसाय झपाट्याने वाढतोय. डाएटिशियन, न्यूट्रिशनिस्ट, फूड क्वालिटी एक्स्पर्ट यांना मागणी वाढली आहे.
शैक्षणिक पात्रता: B.Sc. in Food Tech / Nutrition / Dietetics
पगार: सुरुवात ४–६ LPA, अनुभवावर १५ LPA पर्यंत
नवीन काळातील करिअर = स्किल + कल्पकता + जिद्द
वरील उदाहरणांवरून स्पष्ट होते की लाखोंचा पगार मिळवण्यासाठी आता डॉक्टर किंवा इंजिनिअरच होणं आवश्यक नाही. डिजिटल युगात कौशल्य, कल्पकता आणि शिकण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी हे करिअर पर्याय अधिक फायदेशीर ठरतात.
या क्षेत्रांमध्ये फक्त पैसा नाही, तर प्रसिद्धी, समाधान आणि सतत नवं शिकण्याची संधीही असते.
तर, करिअर निवडताना समाजाच्या पारंपरिक चौकटींपेक्षा तुमच्या आवडी, क्षमता आणि ध्येय यांच्यावर लक्ष केंद्रित करा, यश तुमचं नक्कीच असेल!

