- Home
- lifestyle
- Gold Rate Today : आज सोमवारी सोन्याच्या दर वाढ, जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर येथील दर
Gold Rate Today : आज सोमवारी सोन्याच्या दर वाढ, जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर येथील दर
मुंबई - भारतीय आणि सोने हे एक वेगळेच नाते आहे. त्यामुळेच सणावाराला सोने खरेदीवर भर दिला जातो. फक्त दागिन्यांसाठीच नाही तर गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहिले जाते. म्हणूनच सोन्याच्या दराबाबत ते नेहमीच उत्सुकता दिसून येते.

सोन्याचे दर वाढले
अलिकडे सोन्याच्या दरात चढ-उतार दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर कमी झाले होते. एका वेळी २४ कॅरेट सोन्याचा भाव ९८ हजारांवर आला होता. त्यामुळे सोन्याचे दर खूपच कमी होणार असल्याचा अंदाज सर्वांना होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही.
सोन्याचे दर कमी न होता पुन्हा वाढू लागले. आता सोन्याचा भाव पुन्हा एक लाखांच्या दिशेने वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख शहरांमध्ये सोमवारी सोन्याचा भाव किती होता ते पाहूया.
देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर
* देशाची राजधानी दिल्लीत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १,००,०३० रुपयांवर पोहोचला आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव ९१,७०० रुपयांवर आहे.
* देशाची आर्थिक राजधानी मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ९९,८८० रुपये असून २२ कॅरेट सोन्याचा भाव ९१,५५० रुपये आहे.
* चेन्नईत सोमवारी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ९९,८८० रुपये असून २२ कॅरेट सोन्याचा भाव ९१,५५० रुपयांवर आहे.
* बंगळुरू शहरात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ९९,८८० रुपये असून २२ कॅरेट सोन्याचा भाव ९१,५५० रुपयांवर आहे.
महाराष्ट्रातील इतर शहरांमधील दर
* पुणे- २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹99,880 रुपये असून २२ कॅरेट सोन्याचा भाव ₹91,550 रुपयांवर आहे.
* नाशिक- १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹99,930 रुपये असून २२ कॅरेट सोन्याचा भाव ₹91,580 रुपयांवर आहे.
* नागपूर- १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹99,880 रुपये असून २२ कॅरेट सोन्याचा भाव ₹91,550 रुपये आहे.
सोन्याचे दर आणखी वाढणार का?
सोन्याचा भाव पुन्हा एक लाखांच्या जवळ येत असताना, दर आणखी वाढणार का? असा प्रश्न पडतोय. मात्र, सोने प्रेमींसाठी वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने एक आनंदाची बातमी दिली आहे. येत्या काळात सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
जागतिक भू-राजकीय आणि व्यापारी धोके कमी झाल्यास सोन्याच्या दरात मंदी येऊ शकते किंवा अमेरिकन डॉलर आणि ट्रेझरी यील्ड वाढल्यास जास्त खर्च येऊ शकतो, असे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
चांदीचे दर कसे आहेत?
चांदीचे दरही वेगाने वाढत आहेत. देशातील काही शहरांमध्ये चांदीचा भाव १,२५,००० रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरूसारख्या शहरांमध्ये चांदीचा भाव १,१५,००० रुपये आहे.

