मनोज जरांगेंच्या सहा मागण्या पूर्ण झाल्या असल्या तरीही मराठा आणि कुणबी जाती एकच आहेत का, यावर पेच कायम असून सरकारने दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात ३ सप्टेंबरपासून पुढील ४ दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट तर ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सरकारने सहा महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्यानंतर संपले. जरांगे पाटलांनी भावुक होत हा ऐतिहासिक विजय असल्याचे म्हटले आणि महाराष्ट्रातील मराठा समाज एकसंध असल्याचे स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील यांनी पाचव्या दिवशी आपले उपोषण मागे घेतले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडले. यामुळे त्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय झाल्याचे दिसून येत आहे.
हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदींचा आधार घेत मराठा समाजामधील पात्र असणाऱ्यांना कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा अशी जात प्रमाणपत्रे देण्यासाठी राज्य सरकारने शासकीय अध्यादेश काढलाय.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर, हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे 'कुणबी', 'मराठा-कुणबी' किंवा 'कुणबी-मराठा' जात प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात हैदराबाद आणि सातारा गॅझेटचा मुद्दा ऐरणीवर आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी समाजाला एकत्रितपणे मराठा-कुणबी असे संबोधले आहे.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठी घडामोड घडली आहे. मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्यांना राज्य सरकारने मान्यता दिली असून, हैदराबाद संस्थान गॅझेट लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर सरकारने चर्चेची भूमिका घेतली असून, मंत्रिमंडळ उपसमितीने मसुदा तयार केला आहे. एक शिष्टमंडळ जरांगे पाटलांची भेट घेणार आहे.
बॉम्बे हायकोर्टाने कडक भूमिका घेऊन आंदोलकांना चांगलेच सुनावले आहे. आंदोलकांच्या वकिलांनी बाजू मांडल्यानंतरही मैदान रिकामे करण्यास सांगितले आहे. दरम्यान, आंदोलकांच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितली आहे. न्यायालयाने राज्य सरकारलाही फैलावर घेतले आहे.
Maharashtra