MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे नेमकं काय?, त्याचा मराठा आरक्षणाशी काय संबंध?; जाणून घ्या संपूर्ण पार्श्वभूमी!

हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे नेमकं काय?, त्याचा मराठा आरक्षणाशी काय संबंध?; जाणून घ्या संपूर्ण पार्श्वभूमी!

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात हैदराबाद आणि सातारा गॅझेटचा मुद्दा ऐरणीवर आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी समाजाला एकत्रितपणे मराठा-कुणबी असे संबोधले आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Sep 02 2025, 05:00 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
Image Credit : social media

मुंबई : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात ‘हैदराबाद गॅझेट’ आणि ‘सातारा गॅझेट’ या दोन शब्दांनी वातावरण तापवलं होतं. मनोज जरांगे पाटील यांनी याच गॅझेटच्या अंमलबजावणीची जोरदार मागणी करत सरकारला कोंडीत पकडलं होतं. पण नेमकं हे गॅझेट म्हणजे काय? आणि त्याचा मराठा आरक्षणाशी काय थेट संबंध आहे? हे अनेक जणांना ठाऊक नाही. चला, या गुंतागुंतीचा तपशील सोप्या शब्दांत समजून घेऊया.

27
Image Credit : social media

हैदराबाद गॅझेट म्हणजे काय?

हैदराबाद गॅझेट म्हणजे निझाम काळात (1918 च्या सुमारास) प्रकाशित केलेल्या अधिकृत दस्तऐवजांचे संकलन, ज्यात मराठवाडा, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या भागांमधील विविध जाती-जमातींची माहिती आहे.

1901 साली झालेल्या जनगणनेनुसार या दस्तऐवजामध्ये “मराठा” आणि “कुणबी” समाजाला एकाच गटात समाविष्ट केल्याचे स्पष्ट उल्लेख आहेत.

यामध्ये "मराठा-कुणबी" अशी ओळख देण्यात आली असून, मराठवाड्यात 36% लोकसंख्या मराठा-कुणबी अशी दर्शवलेली आहे.

हा ऐतिहासिक दस्तऐवज सध्या लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमी, उत्तराखंड येथे संग्रहित आहे.

जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांचा दावा असा की, या गॅझेटचा आधार घेत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेता येईल.

Related Articles

Related image1
Manoj Jarange Patil : सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगेंचा ऐतिहासिक विजय, उपोषण जवळपास मागे, हैदराबाद गॅझेट लागू; सरकारने मान्य केल्या या महत्त्वाच्या मागण्या!
Related image2
मराठा आरक्षण आंदोलनात नवा टप्पा, सरकारकडून मसुदा तयार; शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला
37
Image Credit : X

सातारा गॅझेट म्हणजे काय?

सातारा गॅझेट हा सातारा जिल्ह्याचा अधिकृत शासकीय राजपत्र आहे.

यामध्ये जिल्ह्यातील शासकीय योजना, जमिनीचे व्यवहार, निवडणूक सूचना आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित विविध बाबींची नोंद असते.

काही मराठा कुटुंबांची ओळख ‘कुणबी’ म्हणून या गॅझेटमध्ये नोंदवलेली असल्याचा दावा आहे.

जर हे पुरावे ग्राह्य धरले गेले, तर त्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र दिले जाऊ शकते आणि त्यामुळे त्यांना ओबीसी आरक्षण लागू होऊ शकते.

47
Image Credit : X

मराठा आरक्षणासाठी या गॅझेटचं महत्त्व काय आहे?

मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यासाठी कुणबी ओळख आवश्यक आहे.

हैदराबाद गॅझेट म्हणतं, मराठा आणि कुणबी एकच.

सातारा गॅझेट दाखवतं, काही मराठा कुटुंबं कुणबी म्हणून नोंदलेली आहेत.

या दोन्हीचा वापर ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून केला जाऊन, मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण दिलं जावं, ही आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.

57
Image Credit : X

1. सातारा गॅझेट म्हणजे काय?

सातारा जिल्ह्याशी संबंधित अधिकृत शासकीय दस्तऐवज ज्यात स्थानिक योजना, नोंदी आणि आदेश नोंदवलेले असतात.

67
Image Credit : X

2. हैदराबाद गॅझेट म्हणजे काय?

निझाम काळात प्रकाशित दस्तऐवज, ज्यात मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचा ऐतिहासिक उल्लेख आहे.

77
Image Credit : X

3. याचा मराठा आरक्षणाशी काय संबंध?

या दस्तऐवजांच्या आधारे, मराठा समाजातील काहींना कुणबी म्हणून पात्र ठरवून ओबीसी आरक्षण देता येईल, अशी मागणी आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मुंबई बातम्या
मनोज जरांगे पाटील

Recommended Stories
Recommended image1
Ration Card: रेशन कार्डमधून नाव कट झालंय? टेन्शन सोडा, ५ मिनिटांत घरबसल्या करा नवीन नोंदणी!
Recommended image2
Solapur ZP Election : मोहोळमध्ये शिंदेंचं धक्कादायक वक्तव्य; शिवसेनेच्या चिन्हावरील उमेदवारालाच मत देऊ नका!
Recommended image3
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत धक्कादायक प्रकार; नंदुरबारमध्ये 710 पुरुषांचे अर्ज बाद
Recommended image4
Mumbai Pune Expressway : 32 तासांनंतर अपघातग्रस्त गॅस टँकर हटवण्यात यश; मुंबई–पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीत
Recommended image5
IT प्रोफेशनलची चांदी! हिंजवडी ते मुंबई थेट 'शिवनेरी' धावणार; प्रवासाचा एक तास वाचणार, पाहा नवा प्लॅन
Related Stories
Recommended image1
Manoj Jarange Patil : सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगेंचा ऐतिहासिक विजय, उपोषण जवळपास मागे, हैदराबाद गॅझेट लागू; सरकारने मान्य केल्या या महत्त्वाच्या मागण्या!
Recommended image2
मराठा आरक्षण आंदोलनात नवा टप्पा, सरकारकडून मसुदा तयार; शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved