MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, 25 जिल्ह्यांना यलो तर 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, पुढील 4 दिवस महत्त्वाचे

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, 25 जिल्ह्यांना यलो तर 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, पुढील 4 दिवस महत्त्वाचे

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात ३ सप्टेंबरपासून पुढील ४ दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट तर ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Sep 02 2025, 10:19 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
Image Credit : Getty

मुंबई : महाराष्ट्रात हवामानाचा चक्र पुन्हा एकदा बदलला असून, 3 सप्टेंबरपासून पुढील 4 दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट तर 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आले आहेत.

Thunderstorms accompained with lightning, heavy rainfall and gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districsts of North Madhya Maharashtra.

तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/7ZaDLB51DD

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 2, 2025

27
Image Credit : Getty

कोकण आणि मुंबई परिसरात पावसाचा जोर

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह वीजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या तिन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Related Articles

Related image1
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, मराठा आंदोलनाचा मोठा विजय, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित सोडले उपोषण
Related image2
Manoj Jarange Patil : उपोषण सोडतानाचा भावुक क्षण! मनोज जरांगे पाटील धायमोकलून रडले, विखे पाटलांनी दिला आधार
37
Image Credit : Asianet News

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा तडाखा

पुणे जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता असून, यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर परिसरात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

47
Image Credit : Getty

मराठवाड्यात विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस

छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड, नांदेड, हिंगोली याठिकाणी वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता; यलो अलर्ट जारी.

लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

57
Image Credit : ANI

उत्तर महाराष्ट्रातही पावसाची तीव्रता

धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

नाशिक घाटमाथा परिसरात अधिक पावसाचा इशारा.

जळगाव जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा धोका असल्याने ऑरेंज अलर्ट जारी.

67
Image Credit : ANI

विदर्भात हवामान खवळलं

अकोला, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा जिल्ह्यांत वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता; यलो अलर्ट.

बुलढाणा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम याठिकाणीही अशाच स्वरूपाची हवामान स्थिती; यलो अलर्ट.

अमरावती जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा अंदाज; ऑरेंज अलर्ट जारी.

77
Image Credit : pinterest

सावध राहा! हवामान विभागाचा इशारा

राज्यात अनेक भागांत पावसाचे प्रमाण वाढणार असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नद्या, नाल्यांजवळ न जाणं, गरज नसताना प्रवास टाळणं आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणं आवश्यक आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या
मुंबई बातम्या
पुण्याच्या बातम्या
विदर्भातील बातम्या
नाशिक बातम्या
कोल्हापूर बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Ration Card: रेशन कार्डमधून नाव कट झालंय? टेन्शन सोडा, ५ मिनिटांत घरबसल्या करा नवीन नोंदणी!
Recommended image2
Solapur ZP Election : मोहोळमध्ये शिंदेंचं धक्कादायक वक्तव्य; शिवसेनेच्या चिन्हावरील उमेदवारालाच मत देऊ नका!
Recommended image3
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत धक्कादायक प्रकार; नंदुरबारमध्ये 710 पुरुषांचे अर्ज बाद
Recommended image4
Mumbai Pune Expressway : 32 तासांनंतर अपघातग्रस्त गॅस टँकर हटवण्यात यश; मुंबई–पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीत
Recommended image5
IT प्रोफेशनलची चांदी! हिंजवडी ते मुंबई थेट 'शिवनेरी' धावणार; प्रवासाचा एक तास वाचणार, पाहा नवा प्लॅन
Related Stories
Recommended image1
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, मराठा आंदोलनाचा मोठा विजय, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित सोडले उपोषण
Recommended image2
Manoj Jarange Patil : उपोषण सोडतानाचा भावुक क्षण! मनोज जरांगे पाटील धायमोकलून रडले, विखे पाटलांनी दिला आधार
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved