MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Manoj Jarange Patil : सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगेंचा ऐतिहासिक विजय, उपोषण जवळपास मागे, हैदराबाद गॅझेट लागू; सरकारने मान्य केल्या या महत्त्वाच्या मागण्या!

Manoj Jarange Patil : सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगेंचा ऐतिहासिक विजय, उपोषण जवळपास मागे, हैदराबाद गॅझेट लागू; सरकारने मान्य केल्या या महत्त्वाच्या मागण्या!

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठी घडामोड घडली आहे. मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्यांना राज्य सरकारने मान्यता दिली असून, हैदराबाद संस्थान गॅझेट लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 

2 Min read
Rameshwar Gavhane
Published : Sep 02 2025, 04:25 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
Image Credit : social media

मुंबई : मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्यांना मान्यता दिली असून, हैदराबाद संस्थान गॅझेट लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारो मराठा समाजबांधवांना मोठा फायदा होणार आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी मागे हटण्याचा स्पष्ट नकार दिला होता. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दिशेने सरकारने आता निर्णायक पावलं उचलली आहेत.

26
Image Credit : X

मुख्य मागण्यांवर सरकारचा निर्णय:

१. हैदराबाद गॅझेट लागू होणार, पहिला मोठा निर्णय

जरांगे यांनी हैदराबाद आणि सातारा संस्थानातील गॅझेटची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. आता सरकारने याला मान्यता दिली असून, हैदराबाद गॅझेटिअरच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. "एक तासासाठी प्रत द्या, तुमचं ‘ओके’ मिळालं की सरकार तातडीने GR काढेल," असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यामुळे मराठा जातीतील ज्यांना कुळ किंवा गावातील कुणबी प्रमाणपत्र उपलब्ध आहे, अशा व्यक्तींच्या कागदपत्रांची चौकशी करून त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकेल.

Related Articles

Related image1
मराठा आरक्षण आंदोलनात नवा टप्पा, सरकारकडून मसुदा तयार; शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला
Related image2
Bombay HC : ''तुम्ही कोणत्या अधिकारात आझाद मैदानात बसलाय,'' बॉम्बे हायकोर्टाने पुन्हा आंदोलकांना खडसावले, सुनावणी तहकुब
36
Image Credit : X

२. सातारा व औंध गॅझेटवरही लवकरच निर्णय

पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी महत्त्वाच्या असलेल्या सातारा आणि औंध संस्थानातील गॅझेट लागू करण्यावरही सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. सरकारने यातील कायदेशीर अडचणी तपासून १५ दिवसांत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आहे. जरांगे यांनी मात्र, “१५ दिवस नाही, एक महिन्यात करा,” अशी भक्कम भूमिका घेतली आहे.

46
Image Credit : X

३. आंदोलनातील गुन्हे मागे घेणार, प्रक्रिया सुरू

जरांगे आणि त्यांच्या समर्थकांवर महाराष्ट्रभर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीवर सरकार सकारात्मक आहे. काही गुन्ह्यांची तात्काळ माघार घेण्यात आली असून, उर्वरित गुन्ह्यांसाठी कोर्टात अर्ज करून सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण प्रक्रिया करण्यात येणार आहे.

56
Image Credit : X

४. बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत व नोकऱ्या

आंदोलनात जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना आधीच १५ कोटींची आर्थिक मदत देण्यात आली आहे. उर्वरित कुटुंबीयांनाही आठवड्याभरात मदत खात्यात जमा केली जाईल. नोकरीसाठी पात्रतेनुसार नियुक्ती केली जाणार असून, राज्य परिवहन, महावितरण, एमआयडीसी यामध्ये तातडीने भरती करण्याचे आदेश दिले जाणार आहेत.

66
Image Credit : X

मनोज जरांगेंचा विजय का महत्त्वाचा आहे?

या निर्णयांमुळे मराठा समाजाच्या दीर्घकाळच्या मागण्यांना दिशा मिळाली असून, सरकार आणि आंदोलकांमध्ये संवादाचा नवीन अध्याय सुरू झालेला आहे. जरांगे यांचा संघर्ष आता परिणामकारक वळणावर आला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मनोज जरांगे पाटील
महाराष्ट्र बातम्या
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Recommended image2
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती
Recommended image3
Fire Department Vacancy : नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात जम्बो भरती! कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 186 पदांसाठी संधी, लगेच अर्ज करा
Recommended image4
Mahavitaran Bharti 2025 : तरुणांसाठी सुवर्णसंधी! महावितरणमध्ये 300 पदांवर मेगाभरती, दीड लाखांपर्यंत पगार; अर्ज कसा कराल?
Recommended image5
नववर्षात कोकण-गोवा ट्रिप प्लॅन केलीय? रेल्वेची मोठी घोषणा, या मार्गांवर धावणार खास गाड्या वेळापत्रक जाणून घ्या
Related Stories
Recommended image1
मराठा आरक्षण आंदोलनात नवा टप्पा, सरकारकडून मसुदा तयार; शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला
Recommended image2
Bombay HC : ''तुम्ही कोणत्या अधिकारात आझाद मैदानात बसलाय,'' बॉम्बे हायकोर्टाने पुन्हा आंदोलकांना खडसावले, सुनावणी तहकुब
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved