14Th July 2025 Updates : श्रावणातील आज पहिला सोमवार असल्याने भाविकांची शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी होत आहे. याशिवाय दिल्लीत पावसाच्या सरी कोसळत असून मुंबईत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. याशिवाय महाराष्ट्रात प्रविण गायकवाड यांचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. अशाच ताज्या घडामोडींसाठी एशियानेट न्यूज मराठीचे अपडेट्स एका क्लिकवर वाचा...
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे काही व्यक्तींनी हल्ला केला. खरंतर, शिवधर्म फाउंडेशनच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर मुंबईत अभूतपूर्व आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळे फासण्यात आले. शिवधर्म फाऊंडेशन आणि काही शिवभक्तांनी हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे.
पुण्याजवळील सिंहगड, भुलेश्वर, मुळशी, राजगड आणि लवासा ही वन डे ट्रिपसाठी उत्तम ठिकाणे आहेत. इतिहास, निसर्ग, ट्रेकिंग आणि शांतता अनुभवायला हवी असल्यास ही ठिकाणे नक्की भेट द्या.
लग्न ठरलेल्या डॉक्टर अमोल मुंढे यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. रुग्णावर उपचार करण्यासाठी जाताना अपघात झाला. हळदीच्या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पुन्हा जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी झाला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूरसह सोलापूरमध्येही पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून पुण्यातही पावसाने हजेरी लावली आहे.
Ajit Pawar Baramatikar Warning : बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहतूक नियम मोडणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. माझा नातेवाईक असला तरी टायरमध्ये घालून झोडा, असे आदेश त्यांनी पोलिसांना दिले.
Rohit Pawar : ईडीच्या कारवाईला रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांचा कट असल्याचा आरोप केला आहे. कन्नड साखर कारखाना खरेदी प्रकरणात दाखल झालेल्या पुरवणी आरोपपत्रानंतर त्यांनी आपली बाजू मांडली आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
Mhada lottery 2025 : म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे, वसई, सिंधुदुर्ग आणि बदलापूर येथे ५२८५ परवडणाऱ्या घरांची आणि ७७ भूखंडांची सोडत जाहीर झाली आहे. १४ जुलै २०२५ पासून अर्ज सुरू होणार असून, ३ सप्टेंबर २०२५ रोजी सोडत जाहीर होणार आहे.
Maharashtra