Monsoon Trip: वन डे ट्रीपसाठी पुण्याजवळ ठिकाण कोणते आहेत?
Maharashtra Jul 13 2025
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
सिंहगड किल्ला – इतिहास आणि निसर्गाचं संगमस्थान
सिंहगड हा पुण्यापासून अवघ्या ३० कि.मी. अंतरावर असलेला ऐतिहासिक किल्ला आहे. येथे ट्रेकिंग, गडद निसर्ग, आणि "झणझणीत झुणका-भाकर"चा आनंद घेता येतो.
Image credits: social media
Marathi
भुलेश्वर मंदिर – शिल्पकलेचा अद्भुत नमुना
पुण्यापासून सुमारे ५० किमी अंतरावर असलेलं हे प्राचीन मंदिर योगिनींचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. येथील दगडी कोरीव काम पाहून तुम्ही थक्क व्हाल.
Image credits: social media
Marathi
मुळशी डॅम – शांतता आणि सौंदर्याचा मिलाफ
पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांत मुळशी डॅम परिसर म्हणजे स्वर्गच. निसर्गरम्य दृश्य, जलाशयाच्या काठी मस्त फिरणं आणि फोटोसाठी परफेक्ट लोकेशन.
Image credits: Facebook
Marathi
राजगड किल्ला – ट्रेकिंग आणि थरार अनुभवायला हवंय?
राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानी किल्ला होता. ट्रेकिंग प्रेमींना हा एक सुंदर पर्याय आहे. थोडं अवघड वाटणारा ट्रेक पण वर पोहचल्यावर मिळणारा नजारा विसरता येणार नाही.
Image credits: Facebook
Marathi
लवासा – मॉडर्न हिल स्टेशनचा अनुभव
पुण्यापासून फक्त ६० किमीवर असलेलं लवासा हे एक सुंदर, शांत आणि छान नियोजित हिल स्टेशन आहे. सुंदर रस्ते, लेकसाइड वॉक, फोटोजेनिक बॅकग्राउंड लवासा वन डे ट्रिपसाठी हिट ठिकाण आहे.