Rain Alert: आज अतिवृष्टी होणार, पुण्यापासून सोलापूरपर्यंत पाऊस बरसणार
पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पुन्हा जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी झाला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूरसह सोलापूरमध्येही पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून पुण्यातही पावसाने हजेरी लावली आहे.

Rain Alert: आज अतिवृष्टी होणार, पुण्यापासून सोलापूरपर्यंत पाऊस बरसणार
मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. पेरणी करूनही कोंब न धरल्यामुळे दुबार करण्याची नामुष्की शेतकऱ्यावर आली, तर अनेक ठिकाणी अजूनही पाऊस न पडल्यामुळे पाण्याची टंचाई वाढली आहे.
पावसाचा जोर झाला कमी
मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर अतिशय कमी झाला आहे. कमाल तापमानात वाढ झाली असून पारा तिशीच्या पलीकडे जाऊन पोहचला आहे. आज 13 जुलै रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे. चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर पुन्हा जोरदार पाऊस बरसणार आहे.
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळला
सातारा जिल्ह्यात मागील २४ तासांमध्ये चांगला पाऊस कोसळला आहे. सातारा परिसरामध्ये 0.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील २४ तासांमध्ये जिल्ह्याच्या परिसरातील तापमान २९ अंश सेल्सीयस राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुण्यातील शिवाजीनगर परिसरात झाला पाऊस
पुण्यातील शिवाजीनगर परिसरात ६.६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. यावेळी कमाल तापमान ३०.३ अंश सेल्सिअस राहिले. पुढील २४ तासांमध्ये पुणे घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडणार असून येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे परिसरातील नागरिकांनी काळजी घेण्याचं अवाहन करण्यात आल आहे.
कोल्हापूर परिसरात कमाल तापमान 29.1 अंश सेल्सिअस
कोल्हापूर परिसरात कमाल तापमान २९.१ अंश सेल्सिअस तापमान राहील आहे. पुढील 24 तासात कमाल तापमान 29 अंशावर स्थिर राहील. तसेच कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
सोलापूर शहरात पावसाने दिली उघडीप
सोलापूर शहरात पावसाने उघडीप दिली असून 24 तासात 33.7 अंश तापमानाची नोंद सोलापूर मध्ये झाली. शहरातील कमाल तापमान हे ३४ अंश सेल्सियस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची सोलापूर परिसरात शक्यता वर्तवण्यात आली आहे.