सार
लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी बहुतांश ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते. याशिवाय काही ठिकाणी कामामधून काही तासांसाठी मतदान करण्यासासाठी वेळ दिला जातो.
Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाने 16 मार्चला अधिसूचना जारी करत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. यानंतर राजकीय पक्षांकडून लोकसभेच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे उमेदवार प्रचार करण्यात व्यस्त आहेत. अशातच सांगलीत (Sangli) येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. यामुळे सांगतील भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मतदारांनी मतदान करण्याचे अधिकाऱ्यांचे आवाहन
मतदारांनी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी मजूर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय मतदान क्षेत्राच्या बाहेर असलेल्या व्यक्तींनाही मतदानादिवशी सुट्टी असते.
महापालिका, खासगी कंपन्या आणि संस्था आणि औद्योगिक उपक्रमांसह अन्य कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्यांना नागरिकांना मदताना दिवशी सुट्टी असणार आहे. याशिवाय काही कारणास्तव कर्मचारी, अधिकारी यांना संपूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास त्यांना मतदानासाठी काही वेळेची सूट देणे आवश्यक आहे.
दरम्यान, मतदानासाठी जाण्याकरिता संबंधित कामाच्या ठिकाणी परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. याशिवाय कंपन्यांनी मतदारांना दोन ते तीन तासांसाठी मतदानासाठी वेळेस सूट द्यावी. दरम्यान, मतदान करणाऱ्या पुरेसा वेळ किंवा सुट्टी न दिल्यास तक्रार आल्यास संबंधित संस्थेवर कार्यवाहीही केली जाणार आहे.
सात टप्प्यात होणार निवडणूक
देशभरात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. यानंतर 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जूनला मतदान होणार आहे. मतदानाचे निकाल 4 जूनला जाहीर केले जाणार आहेत.
आणखी वाचा :
Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज चंद्रपुरात दौरा, जनसभेला करणार संबोधित
एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास मिळणार राज्यपाल पद? नेमकं काय घडतंय भाजपमध्ये, घ्या जाणून