MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • पुणे मेट्रोचा वाघोलीपर्यंत धडाका! रामवाडी-वाघोली मार्गाची पाहणी पूर्ण; 'दुमजली' उड्डाणपूल आणि १२ स्टेशन्स, असा आहे मेगा प्लॅन

पुणे मेट्रोचा वाघोलीपर्यंत धडाका! रामवाडी-वाघोली मार्गाची पाहणी पूर्ण; 'दुमजली' उड्डाणपूल आणि १२ स्टेशन्स, असा आहे मेगा प्लॅन

Ramwadi to Wagholi metro route: रामवाडी ते वाघोली या १२.५ किलोमीटरच्या मेट्रो मार्गाच्या हालचालींना वेग आला असून, महामेट्रोने पाहणी पूर्ण केली आहे. हा दुमजली उन्नत मार्गावरील प्रकल्प नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करून आयटी हबला मोठा दिलासा देईल. 

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 16 2026, 04:30 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
पुणे मेट्रोचा वाघोलीपर्यंत धडाका! रामवाडी वाघोली मार्गाची पाहणी पूर्ण
Image Credit : social media

पुणे मेट्रोचा वाघोलीपर्यंत धडाका! रामवाडी-वाघोली मार्गाची पाहणी पूर्ण

पुणे: पुणेकरांसाठी मेट्रो प्रवासाचा विस्तार आता खऱ्या अर्थाने शहराच्या सीमा ओलांडून ग्रामीण भागाकडे झेपावत आहे. अत्यंत गजबजलेल्या नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी रामवाडी ते वाघोली या १२.५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या हालचालींनी वेग घेतला आहे. नुकतीच महामेट्रो आणि लोकप्रतिनिधींनी या मार्गाची संयुक्त पाहणी करून प्रकल्पाचा आराखडा निश्चित केला आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये
Image Credit : Gemini Ai

प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये

दुमजली उड्डाणपूल (Double Decker): हा मेट्रो मार्ग पुणे-शिरूर उन्नत महामार्गावर दुसऱ्या मजल्यावरून धावेल. यामुळे जमिनीवरील जागेचा प्रश्न सुटणार आहे.

१२.५ किमीचा टप्पा: रामवाडी ते वाघोली या दरम्यान मेट्रोचे जाळे विणले जाईल.

१२ प्रस्तावित स्टेशन्स: या मार्गावर एकूण १२ स्थानके असतील, ज्यांच्या जागांची प्राथमिक निश्चिती करण्यात आली आहे. 

Related Articles

Related image1
पुणेकरांचा उन्हाळी प्रवास होणार सुखकर! ३३४ स्पेशल ट्रेन धावणार; पाहा तुमच्या शहरासाठीची रेल्वे आणि वेळापत्रक
Related image2
Maharashtra Weather : 20 मार्चपर्यंत अनेक भागात पावसाची शक्यता; मराठवाडा-विदर्भात यलो अलर्ट, शेतकऱ्यांची चिंता वाढली
34
वाहतूक कोंडी फुटणार; पण रस्ते रुंदीकरण आवश्यक!
Image Credit : X

वाहतूक कोंडी फुटणार; पण रस्ते रुंदीकरण आवश्यक!

महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामादरम्यान वाहतुकीचा अडथळा टाळण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूंना ५-५ मीटर जागा प्रकल्पासाठी लागणार आहे.

रुंदीकरण: मेट्रोचे पिलर उभे करण्यापूर्वी सध्याच्या रस्त्याचे रुंदीकरण करावे लागेल, जेणेकरून काम सुरू असतानाही दोन लेनची वाहतूक सुरळीत राहील.

कालावधी: सर्व तांत्रिक परवानग्या वेळेत मिळाल्यास हा प्रकल्प पुढील ३ वर्षांत पूर्ण करण्याचे महामेट्रोचे उद्दिष्ट आहे. 

44
आयटी हबला मोठा दिलासा
Image Credit : X

आयटी हबला मोठा दिलासा

या मेट्रो विस्तारामुळे नगर रस्त्यावरील, वाघोली आणि परिसरातील आयटी हबमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी सोय होणार आहे. रविवारी झालेल्या या पाहणी दौऱ्यात आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्यासह महामेट्रो, वाहतूक पोलीस, पीडब्ल्यूडी आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या सर्वांच्या समन्वयाने प्रकल्पातील तांत्रिक अडचणी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
पुण्याच्या बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maharashtra Board Supplementary Exam 2026 : दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 16 जूनपासून परीक्षांना होणार सुरुवात
Recommended image2
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; RCC संस्थापकाला CBI कडून अटक, लातूरमध्ये शिवसेनेचे आंदोलन
Recommended image3
उद्धव ठाकरेंचा हा खासदार शिंदे गटाला मिळणार, नाव ऐकून म्हणाल हे कस झालं?
Recommended image4
बैल कापला तर आम्ही, संग्राम जगताप यांनी दिला मोठा इशारा
Recommended image5
ST Bus Fare Hike : डिझेल दरवाढीचा ST महामंडळाला फटका; बसभाडे वाढीचे संकेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे मोठे वक्तव्य
Related Stories
Recommended image1
पुणेकरांचा उन्हाळी प्रवास होणार सुखकर! ३३४ स्पेशल ट्रेन धावणार; पाहा तुमच्या शहरासाठीची रेल्वे आणि वेळापत्रक
Recommended image2
Maharashtra Weather : 20 मार्चपर्यंत अनेक भागात पावसाची शक्यता; मराठवाडा-विदर्भात यलो अलर्ट, शेतकऱ्यांची चिंता वाढली
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved