एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास मिळणार राज्यपाल पद? नेमकं काय घडतंय भाजपमध्ये, घ्या जाणून

| Published : Apr 07 2024, 06:36 PM IST

Eknath Khadse
एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास मिळणार राज्यपाल पद? नेमकं काय घडतंय भाजपमध्ये, घ्या जाणून
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांची भाजपामध्ये घरवापसी होणार आहे. एकनाथ खडसे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांची भाजपामध्ये घरवापसी होणार आहे. एकनाथ खडसे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. एकनाथ खडसे यांना आमदारकी दिल्यानंतर त्यांच्या मुलीला प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले होते. त्यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहणार असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. 

एकनाथ खडसे यांना राज्यपाल पद दिले जाणार? 
एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर त्यांच्याकडे राज्यपाल पदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. पण याबाबतची माहिती भाजप किंवा एकनाथ खडसे यांच्याकडून अधिकृत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांना राज्यपाल पद दिले जाणार का नाही हे अजूनही ठरवले जाणार नाही. 

एकनाथ खडसे यांच्याबाबत नेमकं काय झालं? 
एकनाथ खडसे यांना भाजपने मुख्यमंत्रीपद न दिल्यामुळे ते नाराज झाले होते. यावेळी खडसे यांना महसूलमंत्रीपद देण्यात आले होते. पण त्यांच्याकडे जमीन घोटाळ्यामुळे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपमध्ये आपली उपेक्षा होत असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला पण आता परत ते भाजपच्या वाटेवर आहेत. 
आणखी वाचा - 
इंडिया आघाडी सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला दावा
Lok Sabha Election 2024: इंडी आघाडीच्या कोणत्या नेत्यावर पंतप्रधान मोदी बोले? विरोधकांच्या मनात विष भरले असल्याचा देखील उल्लेख