Lok Sabha Election 2024 : बारामतीत शरद पवारांना विरोधकांकडून पराभूत आणि संपवण्याचा जोरदार प्रयत्न केला जातोय, सुप्रिया सुळे म्हणाल्या...

| Published : Apr 08 2024, 07:50 AM IST / Updated: Apr 08 2024, 07:54 AM IST

Sharad Pawar Supriya sule
Lok Sabha Election 2024 : बारामतीत शरद पवारांना विरोधकांकडून पराभूत आणि संपवण्याचा जोरदार प्रयत्न केला जातोय, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न केला जातोय. अशातच शरद पवार यांच्या गटच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच कार्यकर्ता संवाद सभेच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधला.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने (MVA) जोरतार तयारी केली जाते. अशातच शरद पवारांच्या (Sharad Pawar) गटातील नेत्या सुप्रिया सुळेही निवडणुकीसाठी प्रचाराला लागल्या आहेत. नुकत्याच नवी मुंबईत झालेल्या कार्यकर्ता संवाद सभेमध्ये सुप्रिया सुळेंनी जनेतसोबत संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळेंनी म्हटले की, विरोधकांकडून शरद पवारांना पराभूत करण्यासह संपवण्याची खेळी केली जातेय.

नक्की काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे (Supriya Sule) कार्यकर्ता संवाद सभेमध्ये जनतेला संबोधित करत म्हणाल्या की, “आपल्या सर्वांना एकत्रित उभे राहून विरोधकांना 48 जागांवर चुरशीची लढत द्यायची आहे. विरोधक शरद पवारांना बारामती (Baramati) येथून पराभूत करण्याचा आणि संपवण्याचा जोरदार प्रयत्न करतायत. याशिवाय ईस्ट इंडिया कंपनीसारखे माझ्या विरोधात आहेत. पण बारामतीतून माझ्या विरोधात असलेल्यांसोबत मी लढत आहे. बारामती शरद पवारांचा जुना गढ असून आमचा येथून नक्कीच विजय होईल. विरोधकांना वाटतेय बारामतीतील लढत कठीण नसेल, पण त्यांचा विचार चुकीचा आहे.”

बारामतीत सुप्रिया सुळेंना धक्का
इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या माजी सभापती प्रविण माने (Pravin Mane) यांनी शरद पवारांच्या गटाला रामराम ठोकत अजित पवारांच्या गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांच्या पक्षामध्ये दोन गट पडल्यानंतर प्रविण माने यांनी शरद पवारांच्या गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सहभागी होता इंदापुर तालुक्याची सूत्र आपल्या हाती घेतली होती. यानंतर शरद पवारांच्या इंदापूर येथील जाहीर सभेला प्रविण पाटील यांची अनुपस्थिती दिसल्याने चर्चा सुरू झाल्या होत्या.

यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी प्रविण माने यांच्यासह कुटुंबाची भेट घेतली होती. या भेटीनंतरच प्रविण माने यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. प्रविण माने आता बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभ्या असलेल्या अजित पवारांच्या गटातील नेत्या सुनेत्रा पवार यांना प्रचारासाठी साथ देणार आहेत.

सात जागांसाठी शरद पवारांच्या उमेदवारांची यादी जाहीर

शरद पवार यांच्या गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये सात जागांसाठी उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतवरण्यात आले आहे.

  • वर्धा - श्री. अमर काळे
  • दिंडोरी - श्री. भास्कर भगरे
  • बारामती - सौ. सुप्रिया सुळे
  • शिरूर - डॉ. अमोल कोल्हे
  • अहमदनगर - श्री. निलेश लंके
  • बीड - श्री. बजरंग सोनावणे
  • भिवंडी - श्री. सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे

आणखी वाचा : 

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी… कुठे आणि कधी असणार सुट्टी?

एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास मिळणार राज्यपाल पद? नेमकं काय घडतंय भाजपमध्ये, घ्या जाणून

छगन भुजबळ यांनी फक्त लोकसभेला उभे राहूद्या मग दाखवतो, मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना दिले आव्हान

Read more Articles on