MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Pune Metro Expansion: पुणेकरांनो, ट्रॅफिक जॅमला 'बाय-बाय' करण्याची वेळ आली! मेट्रोचे २०० किमीचे जाळे पसरणार; पुण्याचा असा बदलणार चेहरा

Pune Metro Expansion: पुणेकरांनो, ट्रॅफिक जॅमला 'बाय-बाय' करण्याची वेळ आली! मेट्रोचे २०० किमीचे जाळे पसरणार; पुण्याचा असा बदलणार चेहरा

Pune Metro Expansion: पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे मेट्रोचा विस्तार २०० किलोमीटरपर्यंत करण्याचा मेगा प्लॅन जाहीर केला. पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक केली जाणार असून पुणे 'ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर' हब बनल्याने रोजगाराच्या संधी वाढणारय.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 16 2026, 07:50 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
पुणेकरांनो, ट्रॅफिक जॅमला 'बाय बाय' करण्याची वेळ आली!
Image Credit : X

पुणेकरांनो, ट्रॅफिक जॅमला 'बाय-बाय' करण्याची वेळ आली!

पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आता वेगाने 'मेट्रो सिटी' म्हणून प्रस्थापित होत आहे. शहराचा वाढता विस्तार आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. आगामी काळात पुणे मेट्रोचा विस्तार तब्बल २०० किलोमीटरपर्यंत नेण्याचा 'मेगा प्लॅन' तयार असून, यामुळे पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीत क्रांती होणार आहे. शिवाजीनगर येथील नूतन 'मेट्रो भवन'च्या दिमाखदार उद्घाटन प्रसंगी ही मोठी घोषणा करण्यात आली. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
२०० किमीचे जाळे, काय आहे सरकारचा प्लॅन?
Image Credit : social media

२०० किमीचे जाळे, काय आहे सरकारचा प्लॅन?

सध्या पुण्यात ३३ किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो धावत असून पुणेकरांनी तिला डोक्यावर घेतले आहे. भविष्यातील नियोजनाबाबत महत्त्वाचे मुद्दे

विस्तार: सध्याच्या मार्गाव्यतिरिक्त ८० किलोमीटरचे नवीन मार्ग आधीच प्रस्तावित आहेत. टप्प्याटप्प्याने हे जाळे २०० किमीपर्यंत नेले जाईल.

गुंतवणूक: केवळ मेट्रोच नाही, तर रस्ते, उड्डाणपूल आणि बोगद्यांच्या कामांसाठी ३० ते ३५ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

वेग: पुणे मेट्रो हा देशातील सर्वाधिक गतिमान गतीने पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांपैकी एक ठरत आहे. 

Related Articles

Related image1
पुणे मेट्रोचा वाघोलीपर्यंत धडाका! रामवाडी-वाघोली मार्गाची पाहणी पूर्ण; 'दुमजली' उड्डाणपूल आणि १२ स्टेशन्स, असा आहे मेगा प्लॅन
Related image2
पुणेकरांचा उन्हाळी प्रवास होणार सुखकर! ३३४ स्पेशल ट्रेन धावणार; पाहा तुमच्या शहरासाठीची रेल्वे आणि वेळापत्रक
35
पुणे बनणार 'ग्लोबल हब'
Image Credit : Gemini Ai

पुणे बनणार 'ग्लोबल हब'

पायाभूत सुविधांसोबतच पुणे आता रोजगाराच्या बाबतीतही भरारी घेणार आहे. देशात सध्या असलेल्या 'ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर' (GCC) च्या लाटेत पुणे हे मुख्य केंद्र (Hub) म्हणून उदयास येत आहे. याचा थेट फायदा पुण्यातील तरुणांना होणार असून, त्यांना शहरातच उच्च दर्जाच्या आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध होतील. 

45
'मेट्रो भवन': आधुनिक पुण्याचे नवे प्रतीक
Image Credit : X

'मेट्रो भवन': आधुनिक पुण्याचे नवे प्रतीक

पुण्यातील मेट्रो प्रशासनाचे नवे मुख्यालय 'मेट्रो भवन' हे तंत्रज्ञान आणि पर्यावरणाचा उत्तम संगम आहे. या अत्याधुनिक इमारतीमुळे मेट्रोच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणि कार्यक्षमता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 

55
पुणे 'स्मार्ट मेट्रोपॉलिटन' शहर बनणार
Image Credit : X

पुणे 'स्मार्ट मेट्रोपॉलिटन' शहर बनणार

पुणे आता केवळ ऐतिहासिक शहर न राहता, जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधांनी सज्ज असलेले एक 'स्मार्ट मेट्रोपॉलिटन' शहर बनण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
पुण्याच्या बातम्या
Recommended Stories
Recommended image1
रोहिणी खडसे यांनी पकडला हातात साप, नेमकं काय होतं कारण?
Recommended image2
FDA Crackdown: आयुर्वेदिक औषध कंपन्यांवर FDA चा 'सर्जिकल स्ट्राईक', १० कंपन्यांचे परवाने थेट रद्द!
Recommended image3
Gadchiroli Snakebite: जमिनीवर झोपलेल्या मुली, वॉर्डन गायब... सर्पदंशाने ३ विद्यार्थिनींचा मृत्यू, शाळेचा परवाना कायमचा रद्द!
Recommended image4
Food Safety : भिवंडीतील ॲमेझॉनच्या गोदामात मुदत संपलेले पदार्थ, तर तेलाच्या जुन्या डब्ब्यांची नव्या नावाने विक्री
Recommended image5
Weapons Seizure : जालन्यात ४४ बेकायदेशीर शस्त्रं जप्त, अजमेर कनेक्शन समोर
Related Stories
Recommended image1
पुणे मेट्रोचा वाघोलीपर्यंत धडाका! रामवाडी-वाघोली मार्गाची पाहणी पूर्ण; 'दुमजली' उड्डाणपूल आणि १२ स्टेशन्स, असा आहे मेगा प्लॅन
Recommended image2
पुणेकरांचा उन्हाळी प्रवास होणार सुखकर! ३३४ स्पेशल ट्रेन धावणार; पाहा तुमच्या शहरासाठीची रेल्वे आणि वेळापत्रक
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved