MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • पुणेकरांचा उन्हाळी प्रवास होणार सुखकर! ३३४ स्पेशल ट्रेन धावणार; पाहा तुमच्या शहरासाठीची रेल्वे आणि वेळापत्रक

पुणेकरांचा उन्हाळी प्रवास होणार सुखकर! ३३४ स्पेशल ट्रेन धावणार; पाहा तुमच्या शहरासाठीची रेल्वे आणि वेळापत्रक

Pune summer special trains: मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्ट्यांमधील गर्दी लक्षात घेऊन पुणे विभागातून उत्तर भारत, विदर्भासाठी ३३४ विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली. यामुळे पुणे-दानापूर, पुणे-गोरखपूर, पुणे-नागपूर मार्गांवरील प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणार

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 16 2026, 04:10 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
पुणेकरांचा उन्हाळी प्रवास होणार सुखकर!
Image Credit : Google

पुणेकरांचा उन्हाळी प्रवास होणार सुखकर!

पुणे: उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे विभागातून उत्तर भारतासाठी ३३४ विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी होणारी ओढाताण कमी होणार असून, उत्तर प्रदेश, बिहार आणि विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

26
प्रमुख मार्गांचे संपूर्ण वेळापत्रक
Image Credit : Asianet News

प्रमुख मार्गांचे संपूर्ण वेळापत्रक

१. पुणे ते दानापूर (दैनिक विशेष - २१२ फेऱ्या)

बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सर्वात महत्त्वाची गाडी आहे.

गाडी क्र. ०१४४९: १ एप्रिल ते १५ जुलै या काळात दररोज पुण्याहून सुटेल.

गाडी क्र. ०१४५०: ३ एप्रिल ते १७ जुलै या काळात दररोज दानापूरहून पुण्याकडे येईल. 

Related Articles

Related image1
Hadapsar Railway Station: पुणेकरांची 'लाईफलाईन' सुसाट! हडपसर रेल्वे स्थानकाचा कायापालट; आता चौथ्या प्लॅटफॉर्मला ग्रीन सिग्नल!
Related image2
Maharashtra Weather : 20 मार्चपर्यंत अनेक भागात पावसाची शक्यता; मराठवाडा-विदर्भात यलो अलर्ट, शेतकऱ्यांची चिंता वाढली
36
२. पुणे ते गोरखपूर (दैनिक विशेष - ६० फेऱ्या)
Image Credit : iSTOCK

२. पुणे ते गोरखपूर (दैनिक विशेष - ६० फेऱ्या)

गाडी क्र. ०१४१५: १ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान दररोज पुण्याहून रवाना होईल.

गाडी क्र. ०१४१६: २ एप्रिल ते १ मे या काळात गोरखपूरहून परतीचा प्रवास करेल.

46
३. पुणे ते नागपूर (साप्ताहिक सुपरफास्ट - ५३ फेऱ्या)
Image Credit : social media

३. पुणे ते नागपूर (साप्ताहिक सुपरफास्ट - ५३ फेऱ्या)

गाडी क्र. ०१४६९: २१ एप्रिल ते १४ जुलै (प्रत्येक मंगळवारी) पुण्याहून सुटेल.

गाडी क्र. ०१४७०: २२ एप्रिल ते १५ जुलै (प्रत्येक बुधवारी) नागपूरहून सुटेल.

दुसरी गाडी (०१४५७/०१४५८): ही गाडी दर बुधवारी पुण्याहून आणि गुरुवारी नागपूरहून धावेल. 

56
४. पुणे ते गाझीपूर सिटी (द्विसाप्ताहिक विशेष - ८ फेऱ्या)
Image Credit : Google

४. पुणे ते गाझीपूर सिटी (द्विसाप्ताहिक विशेष - ८ फेऱ्या)

गाडी क्र. ०१४३१: १७ ते २८ एप्रिल दरम्यान दर मंगळवार आणि शुक्रवारी पुण्यातून सुटेल.

गाडी क्र. ०१४३२: १९ ते ३० एप्रिल दरम्यान दर रविवार आणि गुरुवारी गाझीपूरहून पुण्याकडे रवाना होईल. 

66
प्रवाशांना नेमका काय फायदा?
Image Credit : South Western Railways - SWR

प्रवाशांना नेमका काय फायदा?

आरक्षण मिळणे सोपे: नियमित गाड्यांवरील भार कमी झाल्यामुळे 'वेटिंग' तिकीट असणाऱ्यांना या विशेष गाड्यांमध्ये सहज आरक्षण मिळू शकेल.

विद्यार्थी आणि कामगारांना दिलासा: उत्तर भारतात सुट्ट्यांसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि कामानिमित्त पुण्यात राहणाऱ्या कष्टकरी वर्गासाठी ही मोठी सोय ठरणार आहे.

गर्दीतून सुटका: ३३४ फेऱ्यांच्या नियोजनामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन करणे रेल्वे प्रशासनाला सोपे जाईल.

टिप: प्रवाशांनी या विशेष गाड्यांच्या आरक्षणासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा तिकीट खिडकीला लवकरात लवकर भेट द्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
पुण्याच्या बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Maharashtra Weather : 20 मार्चपर्यंत अनेक भागात पावसाची शक्यता; मराठवाडा-विदर्भात यलो अलर्ट, शेतकऱ्यांची चिंता वाढली
Recommended image2
Baramati Rahuri Assembly Bypoll Election: महाराष्ट्रात निवडणुकीचा धुरळा! बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं; 'या' दिवशी होणार मतदान!
Recommended image3
Hadapsar Railway Station: पुणेकरांची 'लाईफलाईन' सुसाट! हडपसर रेल्वे स्थानकाचा कायापालट; आता चौथ्या प्लॅटफॉर्मला ग्रीन सिग्नल!
Recommended image4
Kumbha Mela 2027 : कुंभमेळ्यात हिंदूंव्यतिरिक्त कुणी स्टॉल लावला तर उखडून टाका; नितेश राणे यांचे वक्तव्य चर्चेत
Recommended image5
Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा 'अस्मानी' संकट! उन्हाच्या तडाख्यात ७ जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा; हवामान खात्याचा मोठा इशारा
Related Stories
Recommended image1
Hadapsar Railway Station: पुणेकरांची 'लाईफलाईन' सुसाट! हडपसर रेल्वे स्थानकाचा कायापालट; आता चौथ्या प्लॅटफॉर्मला ग्रीन सिग्नल!
Recommended image2
Maharashtra Weather : 20 मार्चपर्यंत अनेक भागात पावसाची शक्यता; मराठवाडा-विदर्भात यलो अलर्ट, शेतकऱ्यांची चिंता वाढली
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved