राष्ट्रीय तपास यंत्रणेने बंगळुरूसह सात राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकले. त्यांनी सतरा ठिकाणी शोधमोहीम सुरु केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
लैंगिक अत्याचारांना चाप बसण्यासाठी बालरोगतज्ज्ञ संजय कुलश्रेष्ठ यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येणाऱ्या अश्लील कंटेटवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
पाकिस्तानात शहबाज शरीफ रविवारी (3 मार्च) दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. अशातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहबाज शरीफ यांना पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी हे प्रकाशन आरएसएस सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मंदी यांनी चेन्नई आणि कल्पक्कम येथे लोकांना संबोधित केले आहे. त्यांनी चेन्नईत लोक उत्साही असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उद्यानिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. त्यांनी सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधान केले होते.
पुणे येथील रस्त्यांवर स्क्रू फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा एक व्हिडीओ देखील स्थानिक नागरिकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. याशिवाय पुणेकरांनी रस्त्यावर कोणीतरी मुद्दाम स्क्रू फेकल्याने संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाशिममध्ये अनावरण करण्यात आले आहे. या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे काही फोटो समोर आले आहेत.
तृणमूल काँग्रेस नेत्या महुआ मोइत्रा यांना मोठा धक्का बसला आहे. लाचखोरीचा आरोप करण्यापासून रोखण्याची मागणी फेटाळून लावली आहे.