सार

काटोलमध्ये प्रचारादरम्यान अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला असून ते जखमी झाले आहेत. भाजपाकडून हल्ला झाल्याचा आरोप देशमुखांनी केला असून परिणय फुके यांनी मात्र देशमुखांवरच हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला आहे.

अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी हा हल्ला भाजपाकडून केल्याचं सांगण्यात आलं असून आता दोनही पक्षांकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत. काटोल विधानसभा मतदारसंघात प्रचार सुरु असताना त्यांच्यावर हा निर्घृण हल्ला करण्यात आला आहे. पोलिसांनी ४ व्यक्तींवर खून करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

परिणय फुके काय म्हणाले? - 

परिणय फुके यांनी यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी हा हल्ला घडवून आणल्याचं त्यांनी म्हटलं आहे. परिणय फुके यांनी बोलताना म्हटलं आहे की, सहानुभुती मिळवण्यासाठी अनिल देशमुख यांच्याकडून दगड फेकीचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक झाली. देशमुखांच्या गाडीच्या काचांना क्रॅक गेलेले दिसत आहेत.

 दगड जर लांबून फेकलेला असता तर काचेवर पडला असता मग तो बोनेटवर पडला असता. पण गाडीच्या बोनेटवर एकही स्क्रॅश दिसत नाहीये. गाडीची मागच्या बाजूची काच फुटलेली आहे. देशमुख ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर आहेत. त्यांच्या पायाजवळ एक दगड पडलेला दिसत आहे. या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहे.