महाराष्ट्रातील राजकारणापासून ते ऑलिंपिकपर्यंत, वाचा आजच्या टॉप 10 बातमी

| Published : Aug 08 2024, 08:25 PM IST / Updated: Aug 08 2024, 08:29 PM IST

top 10 news

सार

हा लेख महाराष्ट्रातील राजकारण, मराठा आरक्षण, मनोज जरांगेंच्या टीका, विधानसभा निवडणुकीच्या रणनीती, म्हाडाची घरे, पुण्यातील अमोनिया गॅस गळती, नीरज चोप्रा, विनेश फोगाट, वक्फ बोर्ड आणि नागा चैतन्यच्या साखरपुड्यासह इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेतो.

1. '...तर दूध का दूध, पानी का पानी होईल'; राधाकृष्ण विखेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंवर जोरदार टीका केली आहे. जरांगेंनी गोलमेज परिषद घ्यावी आणि त्यात काँग्रेस नेत्यांना बोलवावे, जेणेकरून दूध का दूध पानी का पानी होईल.

2. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा विधानसभा निवडणूक 'अ‍ॅक्शन प्लॅन'

मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा उमेदवार उभे करणे, डेटा गोळा करणे, शांतता रॅली काढणे अशा विविध रणनीती आखल्या आहेत.

3. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याने 'या' चर्चेला उधाण!

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी झालेल्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

4. मुंबईकरांसाठी सुवर्णसंधी, मुंबईत म्हाडाची 2030 घरांसाठी लॉटरी

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईत 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली. पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड येथे ही घरे उपलब्ध असून अर्ज नोंदणी 9 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

5. Pune : फूड प्रोसेसिंग युनिटमधून अमोनिया गॅस गळती, 17 जण रुग्णालयात दाखल

Ammonia Gas Leak : पुणे येथील एका फूड प्रोसेसिंग युनिटमधून अमोनिया गॅस लीक झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे. यामुळे 17 जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

6. सुवर्ण जिंकण्यासाठी नीरज चोप्रा उतरणार मैदानात, जाणून घ्या कधी पाहता येईल फायनल

भारताचा स्टार ॲथलीट नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी भाग घेणारय. तो पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत अंतिम फेरीत खेळणारय. जर तो सुवर्णपदक जिंकला तर भालाफेकमध्ये विजेतेपदाचे रक्षण करणारा तो ऑलिंपिक इतिहासातील 5 वा व्यक्ती बनेल.

7. 'माँ कुश्ती मेरे से जीत गई, मैं हार गई', विनेश फोगाटकडून निवृत्तीची घोषणा

Vinesh Phogat announces retirement : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाटने निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे अनेकांना धक्का बसला असून आता त्यावर राजकीय ते सर्वसामान्य स्तरातून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

8. वक्फ बोर्ड विधेयक लोकसभेत मांडले, सपा-काँग्रेसचा गदारोळ; ओवेसी काय म्हणाले?

लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले आहे. ज्यामुळे बोर्डाच्या अधिकारांवर अंकुश येणार आहे. विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला असून ते सरकारवर समुदायांमध्ये वाद निर्माण करण्याचा आरोप करत आहेत.

9. Explainer: रेपो रेट-रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, दोन्ही कसे कार्य करतात?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर 6.5% वर कायम ठेवला आहे. हा दर बँकांना कर्ज देण्याच्या किमतीवर परिणाम करतो आणि त्याचा परिणाम महागाईवर होतो. हा लेख रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर काय आहे आणि त्यांचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो हे स्पष्ट करतो.

10. Naga Chaitanya-Sobhita Dhulipala यांच्या साखपुरड्याचे पाहा First Photos

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपाला यांचा अखेर साखरपुडा झाला आहे. कपलचे साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. या दोघांचा साखरपुडा नागाच्या हैदराबाद येथील निवासस्थानी पार पडला.