'...तर दूध का दूध, पानी का पानी होईल'; राधाकृष्ण विखेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल

| Published : Aug 08 2024, 07:15 PM IST / Updated: Aug 08 2024, 07:19 PM IST

Radhakrushna Vikhe Patil on Manoj Jarange Patil
'...तर दूध का दूध, पानी का पानी होईल'; राधाकृष्ण विखेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंवर जोरदार टीका केली आहे. जरांगेंनी गोलमेज परिषद घ्यावी आणि त्यात काँग्रेस नेत्यांना बोलवावे, जेणेकरून दूध का दूध पानी का पानी होईल.

Radhakrushna Vikhe Patil on Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांनी फक्त मराठा आरक्षणावर लक्ष केंद्रित करावं, विनाकारण देवेंद्र फडणवीसांवर टीका करू नये, असं म्हणत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंवर जोरदार टीका केली. मनोज जरांगे यांनी गोलमेज परिषद घ्यावी आणि त्यात काँग्रेसच्या बोलघेवड्या आणि उबाठाच्या स्वयंघोषित नेत्यांना बोलवावं. मग दूध का दूध पानी का पानी होईल, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी मनोज जरांगे यांना चांगलच सुनावले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणी आडून देवेंद्र फडणवीसांवर टीका

राज्यात मराठा आरक्षण प्रश्न गंभीर होत चालला असताना राजकीय वातावरण ढवळून गेले आहे. एकीकडे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पश्चिम दौरा सुरू केला असून दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचाव यात्रेतून ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीला जोरदार विरोध होताना दिसत आहे. दरम्यान आरक्षणाच्या आडून फडणवीसांवर टीका करण्याचं थांबवा असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत.

महाविकास आघाडीचा भ्रमनिरास होणार

लोकसभा निवडणुकीच्या वेळी जो नकारात्मक प्रचार झाला त्याला अनेक कांगोरे आहेत. गेली दोन वर्ष काँग्रेस मित्रपक्ष त्या विषयावर काम करत होते. स्थानिक नेत्यांच्या कल्पनाशक्ती पलीकडे आहे. निवडणूक काळात काँग्रेस नेत्यांमुळे नकारात्मकता पसरवण्यास मदत मिळाली. सामान्य जनतेची दिशाभूल आणि बुद्धिभेद याचे हे यश आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा नाही. जनतेला त्यांची चूक कळलेली आहे. ज्या भ्रमात महाविकास आघाडीचे नेते वावरत आहेत त्यांचा भ्रमनिरास जनता लवकरच करेल असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका

आता सुट्टी नाही, मराठा समाजाला आम्ही आरक्षण घेऊनच राहणार आहे. 50 टक्क्यांच्या आतच ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. 50 टक्क्यांच्या वर बोलायचं नाही, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. ते तुळजापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपने माझ्या मागं टोळ्या लावल्या आहेत. पण या टोळ्या देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाचा सुफडा साफ करतील असे जरांगे पाटील म्हणाले. भाजपमधील मराठा खवळला आहे. त्यांच्यामध्ये मोठी खदखद असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

आम्ही सरकारला वेळोवेळी सांगत आहे की, आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही. तुम्ही आम्हाला समजून घ्या असे जरांगे पाटील म्हणाले. राज्यात जेवढे राजकीय पक्ष आहेत, त्यांनी सांगायला पाहिजे की मराठ्यांचे ओबीसीतील आरक्षण द्यायला पाहिजे असे जरांगे पाटील म्हणाले. तुमच्याकडे सत्ता आहे, बहुमत आहे, तुम्ही आरक्षण द्या असे जरांगे म्हणाले.

आणखी वाचा :

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा विधानसभा निवडणूक 'अ‍ॅक्शन प्लॅन'

'सगळे चोर फडणवीसांकडेच', मनोज जरांगे पाटलांचा सोलापुरात हल्लाबोल