MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • LPG सिलेंडर संपले, नवरदेवाने ऐनवेळी मेन्यू बदलला; पाहुणेही झाले खुश!

LPG सिलेंडर संपले, नवरदेवाने ऐनवेळी मेन्यू बदलला; पाहुणेही झाले खुश!

Bhopal Wedding Crisis LPG Shortage Forces Groom to Change Menu Last Minute: सध्या देशभरात LPG गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा जाणवत आहे.भोपाळमध्ये एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये १५०० लोकांसाठी जेवण बनवायचं होतं, पण सिलेंडरच मिळाले नाहीत.

2 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Mar 16 2026, 06:38 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
Image Credit : social media
भोपाळमध्ये गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे एका लग्नाचा मेन्यू बदलावा लागला. अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे भारतात LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरांपासून गावांपर्यंत लोकांना सिलेंडर मिळत नाहीयेत. आता याचा परिणाम थेट लग्नसोहळ्यांवर दिसू लागला आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
Image Credit : Getty
ही घटना भोपाळच्या ईटखेडी भागातील स्वयंवर मॅरेज गार्डनमधली आहे. इथे रोहित माळी नावाच्या तरुणाचं लग्न होतं. त्याने रिसेप्शनसाठी तब्बल १८ ते २० पदार्थांचा मेन्यू ठरवला होता. पण ऐनवेळी गॅस सिलेंडरची व्यवस्थाच झाली नाही, त्यामुळे दोन्हीकडच्या कुटुंबीयांची आणि आचाऱ्याची धांदल उडाली. कारण जेवण तब्बल १५०० लोकांसाठी बनवायचं होतं. नवरदेव आणि नवरीच्या घरच्यांनी आदल्या दिवसापर्यंत सिलेंडर मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण काहीच उपयोग झाला नाही.

Related Articles

Related image1
LPG Complaint: गॅस सिलेंडर बुक केलाय पण डिलिव्हरी मिळेना? नेमकं काय करायला हवं?
Related image2
सावधान! आता एकाच घरात LPG आणि PNG दोन्ही चालणार नाही; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवे नियम
35
Image Credit : Google
जेव्हा गॅस सिलेंडर मिळालेच नाहीत, तेव्हा दोन्ही कुटुंबांनी नाइलाजाने रिसेप्शनचा प्लान बदलला. त्यांनी गॅस शेगडीऐवजी लाकडाच्या चुलीवर जेवण बनवण्याचा निर्णय घेतला. आधी लग्नाचा मेन्यू बदलला, मग भरपूर लाकडं गोळा केली. त्यानंतर रातोरात १२०० ते १५०० लोकांसाठी गरमागरम दाल-बाफले तयार केले.
45
Image Credit : freepik
नवरदेव रोहितने मीडियाशी बोलताना सांगितलं, 'आम्ही रिसेप्शनमध्ये खूप वेगवेगळे पदार्थ बनवण्याचं ठरवलं होतं. सगळी तयारी झाली होती. पण अचानक गॅस मिळणार नाही हे कळल्यावर आम्ही खूप घाबरलो. आता काय होणार, उद्या पाहुणे आल्यावर त्यांना काय खायला घालणार, हेच आम्हाला कळत नव्हतं.'
55
Image Credit : X
अखेर मॅरेज गार्डनमध्ये गॅस शेगड्यांऐवजी लाकडाच्या चुली पेटल्या. हे दृश्य खूपच वेगळं होतं. पण पाहुण्यांना हे दाल-बाफले इतके आवडले की त्यांनी या अस्सल पदार्थाचं खूप कौतुक केलं. ते म्हणाले, 'गॅसची समस्या पुढेही वाढू शकते, त्यामुळे लग्नकार्य करताना या गोष्टीची काळजी घ्यायला हवी.'

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
भारताचे बातम्या

Recommended Stories
Recommended image1
National Sports Awards: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, यंदा खेलरत्न नाहीच; 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार!
Recommended image2
Temple Device: पी.व्ही. सिंधूच्या डोक्यावर ते काय आहे? Zomato च्या मालकाचा याच्याशी काय संबंध?
Recommended image3
Delhi Blast: दिल्ली हादरली! टिकरी मेट्रो स्टेशनजवळ CNG सिलेंडरचा स्फोट, तिघांचा जागीच मृत्यू
Recommended image4
Rapido Hustle: सुट्टीत रॅपीडो चालवून दिवसाला ₹1200 कमावले; बंगळूरच्या विद्यार्थ्याचा अनुभव व्हायरल
Recommended image5
India Day: न्यूयॉर्कमध्ये भारताचा जयजयकार, तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाली एम्पायर स्टेट बिल्डिंग!
Related Stories
Recommended image1
LPG Complaint: गॅस सिलेंडर बुक केलाय पण डिलिव्हरी मिळेना? नेमकं काय करायला हवं?
Recommended image2
सावधान! आता एकाच घरात LPG आणि PNG दोन्ही चालणार नाही; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवे नियम
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved