Pune : फूड प्रोसेसिंग युनिटमधून अमोनिया गॅस गळती, 17 जण रुग्णालयात दाखल

| Published : Aug 08 2024, 08:09 AM IST / Updated: Aug 08 2024, 08:12 AM IST

roshni

सार

Ammonia Gas Leak : पुणे येथील एका फूड प्रोसेसिंग युनिटमधून अमोनिया गॅस लीक झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे. यामुळे 17 जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Ammonia Gas Leak in Pune : पुण्यातील यवत परिसरातील फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये काम करणाऱ्या 17 जणांना अमोनिया गॅस गळती झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या मते, यवतजवळ भांडगांव येथे असणाऱ्या रेडी-टू-ईट खाद्यपदार्थ तयार करण्याचे युनिट आहे. हे पदार्थ तयार करण्यासाठी 18 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची आवश्यकता असते. जेणेकरुन अमोनियाचा वापर करुन रेडी-टू-ईट पदार्थ तयार केले जाऊ शकतात.

नक्की काय घडले?
यवतच्या पोलिसांनी घटनेची सविस्तर माहिती देत म्हटले की, बुधवारी एका युनिटमधून अमोनिया गॅस गळती झाली. यावेळी 25 जण काम करत होते. त्यामध्ये बहुतांश महिलांचा समावेश होता. याशिवाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले, गॅस गळती झाल्याने 17 कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास झाला. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. जेथून गॅस गळती झाली त्या ठिकाणापासून महिला अत्यंत जवळ होती.

गॅस गळती झाल्यानंतर मुख्य रेग्युलेटर बंद करण्यात आले. यानंतर कर्मचाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले. सध्या 16 कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय थेट गॅसच्या संपर्कात आलेल्या महिलेवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. महिला डॉक्टरांच्या निगराणीखाली असून सध्या तिची देखील स्थिर आहे.

आणखी वाचा : 

महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत १३ मोठे निर्णय, जाणून घ्या तुमच्यासाठी काय?

'सगळे चोर फडणवीसांकडेच', मनोज जरांगे पाटलांचा सोलापुरात हल्लाबोल