सार

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईत 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली. पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड येथे ही घरे उपलब्ध असून अर्ज नोंदणी 9 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक (MHADA) असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत (Mhada Lottery) जाहीर करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 9 ऑगस्ट, 2024 रोजी दुपारी 12 वाजेपासून प्रारंभ होणार आहे. https://housing.mhada.gov.in , https://mhada.gov.in , Mobile App- MHADA Housing Lottery System याठिकाणी म्हाडा लॉटरीबाबत सविस्तर माहिती पाहता येईल.

मुंबईतील ‘या’ भागात म्हाडाची घरं?

म्हाडाने बांधलेल्या 1327 घरांसोबत कास नियंत्रण नियमावाली अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून बिल्डर्सकडून मिळालेली 370 घरं आणि पूर्वीच्या लॉटरीत विविध ठिकाणी उरलेल्या 333 घरांचा या सोडतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. म्हाडाच्या लॉटरीसाठी नेहमीप्रमाणे अत्यल्प (6 लाख), अल्प (9 लाख), मध्यम (12 लाख), उच्च उत्पन्न गट म्हणजे 12 लाखांपेक्षा अधिक असे उत्पन्ननिहाय गट करण्यात आले आहेत. मुंबई उपनगरातील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड याठिकाणी म्हाडाची घरे आहेत. या घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.

म्हाडाची कोणत्या गटासाठी किती घरं?

म्हाडाकडून ज्या 2030 घरांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार आहे, त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 359, अल्प उत्पन्न गटासाठी 627, मध्यम उत्पन्न गटासाठी 768 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 276 घरं उपलब्ध आहेत.

म्हाडाच्या अर्जाची किंमत किती?

अर्ज शुल्क ₹ ५००/- + जीएसटी @ १८% ₹९०/- एकूण ₹ ५९०/- अर्ज शुल्क विना परतावा

म्हाडा लॉटरीचे सविस्तर वेळापत्रक

सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरूवात दिनांक व वेळ- दि. ०९/०८/२०२४ दुपारी १२.०० वा. पासून

अनामत रक्कम भरण्याचा दिनांक व वेळ- दि. ०९/०८/२०२४ दुपारी १२.०० वा. पासून

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटचा दिनांक व वेळ- दि. ०४/०९/२०२४ दुपारी ३.०० वा. पर्यंत

अनामत रक्कम भरणा करण्यासाठी शेवटचा दिनांक व वेळ- दि. ०४/०९/२०२४ रात्री ११.५९ वा. पर्यंत

सोडतीसाठी प्राप्त अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ- दि. ०९/०९/२०२४ सायंकाळी ६.०० वा.

प्रारुप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे/हरकती दाखल करण्याचा अंतिम दिनांक व वेळ- दि. १०/०९/२०२४ दुपारी १२.०० वा. पर्यंत

सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादी प्रसिद्धी दिनांक व वेळ- दि. ११/०९/२०२४ सायंकाळी ६.०० वा

सोडतीचा दिनांक व वेळ- दि. १३/०९/२०२४ सकाळी ११.०० वा.

सोडतीचे ठिकाण- नंतर जाहीर करण्यात येईल.

आणखी वाचा : 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा विधानसभा निवडणूक 'अ‍ॅक्शन प्लॅन'