सार

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपाला यांचा अखेर साखरपुडा झाला आहे. कपलचे साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. या दोघांचा साखरपुडा नागाच्या हैदराबाद येथील निवासस्थानी पार पडला.

Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Engagement : साउथ सिनेमातील सुपरस्टार नागा चैतन्यने गर्लफ्रेंड शोभिता धूलिपालासोबत गुरुवारी (8 ऑगस्ट) अखेर साखरपुडा केला. कपलच्या साखरपुड्याचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नागा चैतन्य आणि शोभिताच्या साखरपुड्याचे फोटोज अभिनेता नागार्जुनने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर शेअर केले आहेत.

नागार्जुनची खास पोस्ट
नागार्जुनने लेकाच्या साखरपुड्यासंबंधित खास पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्याने म्हटले आहे की, आज सकाळी 9 वाजून 42 मिनिटांनी नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपाला यांचा साखरपुडा झाला आहे. यामुळे मला अत्यंत आनंद होत आहे. शोभिताच्या परिवाराचे आमच्या परिवारात स्वागत करतानाही खूप आनंद होतोय. दोघांना शुभेच्छा. दोघांचे एकमेकांवर आयुष्यभर प्रेम राहू दे. नागा चैतन्य आणि शोभिकाच्या साखरपुड्याला केवळ घरातील मंडळीच उपस्थितीत होती.

नागा चैतन्य आणि शोभिताचे रिलेशनशिपच्या चर्चांना पूर्णविराम
अखेर नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपाला यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या दीर्घकाळापासून दोघांच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरु होती. गुरुवारी साखरपुडा झाल्यानंतर आता कपलच्या लग्नाची वाट चाहत्यांकडून पाहिल जात आहे. रिपोर्ट्सनुसार, नागा आणि शोभिताच्या लग्नाची तारीखही लवकरच जाहीर केली जाणार आहे.

आनंदीत दिसली शोभिता धूलिपाला
नागा चैतन्यसोबत्या साखरपुड्याचे फोटो समोर आल्यानंतर शोभिता धूलिपाला अत्यंत आनंदीत झाल्याचे दिसून आले आहे. यावेळी शोभिताने पेस्टल रंगातील साडी नेसली होती. केसांमध्ये गजरा माळला होता. साखरपुड्यावेळचा शोभिताचा लूक अत्यंत सुंदर दिसत होता. तर नागा चैतन्यने पांढऱ्या रंगातील कुर्ता आणि दुपट्टा कॅरी केला होता. नागार्जुनने दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये होणारी सून आणि लेकासोबत नागार्जुनही अत्याधिक आनंदीत असल्याचे दिसत आहे.

नागा चैतन्यचा घटस्फोट
नागा चैतन्यचा सामंथा रुथ प्रभूसोबत घटस्फोट झाला आहे. नागाने सामंथासोबत वर्ष 2017 मध्ये लग्न केले होते. लग्नाच्याआधी दोघांनीही एकमेकांनी दीर्घकाळ डेट केले होते. मात्र वर्ष 2021 मध्ये दोघांचे लग्न मोडले.

आणखी वाचा : 

नागा चैत्यनचा शोभिता धूलिपालासोबत साखरपुडा, वडिलांनीही नात्याला दिला होकार

440Cr चा मालक असणाऱ्या Jr NTR ची कमाई ऐकून बसेल धक्का