सार

Vinesh Phogat announces retirement : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाटने निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे अनेकांना धक्का बसला असून आता त्यावर राजकीय ते सर्वसामान्य स्तरातून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

Vinesh Phogat announces retirement : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या 13 व्या दिवसाच्या सकाळीच भारतीय चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरंतर, कुस्तीपटू विनेश फोगाटने कुस्तीमधून निवृत्ती घेत असल्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. 29 वर्षीय महिला कुस्तीपटू विनेशने सोशल मीडियावर आपल्या आईसाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये आईला कुस्ती जिंकली पण माझा पराभव झाला असे म्हटले आहे. विनेशनच्या याच पोस्टवर आता अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय लिहिलेय विनेशच्या पोस्टमध्ये?
विनेश फोगाटने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, “आई कुस्ती जिंकली पण माझा पराभव झाला. माफ कर तुझे स्वप्न, माझी हिंम्मत सर्वकाही मोडले आहे. यापेक्षा अधिक आता ताकद राहिलेली नाही. अलविदा कुस्ती 2001-2024 च्या पुढे विनेशने माफी मागत तुमच्या सर्वांची ऋणी राहिन” असेही  पोस्टमध्ये म्हटले आहे. विनेश फोगाटच्या निर्णयामुळे तिच्यावर गर्वही वाटतोय तर काहींच्या डोळ्यांत विनेशसाठी अश्रूही उभे राहत आहेत.

भारताच्या वाघिणीवर सर्वांना गर्व
अनेकांना विनेशच्या निवृत्तीच्या घोषणामुळे धक्का बसला आहे. यावर सोशल मीडिया युजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात आता सुरुवात केली आहे. एका युजरने म्हटले की, तुझ्यावर गर्व आहे चॅम्पियन. याशिवाय अन्य युजर्सने विनेशच्या निर्णयावर दु:ख व्यक्त करत तिला पाठिंबाही दिला आहे. 

 

 

 

 

 

 

 

उपात्यं फेरीत विनेश फोगाटचा विजय
अंतिम सामन्याआधी झालेल्या उपांत्य फेरीमध्ये विनेश फोगाटने 5-0 चा अंतराने कुस्तीचा सामना जिंकला होता. यामुळे विनेश अंतिम सामन्यासाठी पात्र ठरलेली विनेश एकमेव भारतीय महिला पैलवान ठरली होती. पण अंतिम सामान्याआधी 100 ग्रॅम वजन अधिक झाल्याने विनेशला अंतिम सामान्यातून बाद करण्यात आले.

आणखी वाचा : 

हृदयद्रावक क्षण : ऑलिम्पिक अपात्रतेनंतर विनेश फोगटचा पहिला फोटो तुम्ही पहिला का?

कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर, भारताला मोठा धक्का