सार

मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा उमेदवार उभे करणे, डेटा गोळा करणे, शांतता रॅली काढणे अशा विविध रणनीती आखल्या आहेत.

Manoj Jarange Patil Action Plan : मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे राजकारण आणि समाजकारण ढवळून काढले आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांची ताकद राज्यात दिसून आली आहे. मराठवाड्यात रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे हे भाजपाचे मातब्बर उमेदवार पाडण्यात 'जरांगे फॅक्टर' निर्णयाक ठरला आहे. मराठवाड्यासह राज्यातील अन्य भागातही या फॅक्टरचा महायुतीला जोरदार फटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुभवानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

मनोज जरंगे पाटील यांचा विधानसभा निवडणूक ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आजवर उपोषण करणारे, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक कशी लढणार? या निवडणुकीत त्यांची रणनीती कशी असेल? जरांगे पाटील किती जागा लढणार? कुणाला टार्गेट करणार? या सर्व विषयांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ आपण पाहणार आहोत.

1. मराठा उमेदवार मैदानात उतरवणार 

जरंगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण न केल्यास सर्व २८८ विधानसभा मतदारसंघात मराठा उमेदवार उभे करणार असल्याचे जरंगे यांनी जाहीर केले.

2. डेटा गोळा करणार

आगामी निवडणुकांच्या रणनीतींवर चर्चा करण्यासाठी ते सर्व 288 विधानसभा मतदारसंघातून डेटा गोळा करत आहेत. या गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर ते पुढील रणनीती ठरवणार आहेत. 

3. शांतता रॅली काढणार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जनजागृती करण्यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यव्यापी 'जनजागृती शांतता यात्रा' मोहिमेसह संपूर्ण महाराष्ट्रात शांतता रॅली काढत आहेत. या शांतता रॅलीच्या माध्यमांतून मराठा समाजात ते जनजागृती करणार आहेत. कारण मराठा समाजाची ताकद सर्वांनी लोकसभा निवडणुकीत पाहिली आहे.

4. कागदपत्रे तयार ठेवणार

त्यांनी संभाव्य विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांना त्यांची कागदपत्रे तयार ठेवण्याचा सल्ला दिला आहे. जे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक उमेदवार आहेत त्यांना विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक ती सगळी तयारी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

5. संयुक्त आघाडी करणार

मराठा समाजातील विविध गटांना एकत्र करून निवडणुकीत एकजूट दाखवण्याचा मनोज जरांगे पाटील प्रयत्न करत आहेत. ते मराठा समाजातील विविध गटांसह इतर आठरापगड जातीमधील लोकांना सोबत घेणार आहेत. 

मनोज जरंगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या

1. मराठा आरक्षण

मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी करत आहेत.

2. कुणबी प्रमाणपत्रे

मनोज जरांगे पाटील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राची मागणी करत आहेत, ज्यामुळे त्यांना ओबीसी दर्जा मिळेल.

3. रक्ताच्या नातेवाईकांना मान्यता देणे

कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठ्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना मान्यता देण्याची मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे.

आणखी वाचा : 

'सगळे चोर फडणवीसांकडेच', मनोज जरांगे पाटलांचा सोलापुरात हल्लाबोल